Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

जीते है दिलशानसे
पोर्ट एलिझाबेथ, २६ एप्रिल / वृत्तसंस्था

तिलकरत्ने दिलशानने ४७ चेंडूत केलेल्या दोन षटकार व पाच चौकारांसह केलेल्या ६७

 

धावा आणि मिथुन मन्हासने त्याला १३ चेंडूंत २३ धावा करून दिलेली तोलामोलाची साथ यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. प्रथम फलंदाजी करताना बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने केलेल्या ७ बाद १४९ धावांना प्रत्युत्तर देताना दिल्लीने सहा विकेट्स शिल्लक राखून १५०धावा केल्या. दिलशानलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. बंगलोरला आज राहुल द्रविडची उणीव जाणवली. घरगुती कारणास्तव द्रविड मायदेशी परतला, पण संघात मार्क बाऊचरचे आगमन झाले. त्याने ३६ धावांची खेळी केली. कर्णधार पीटरसननेही ३७ धावा केल्या. दिल्लीला मात्र सेहवाग व गंभीर या भरवशाच्या फलंदाजांकडून यावेळी योगदान मिळू शकले नाही. पण दिलशानने संयमी फलंदाजी करीत चोख कामगिरी बजावली. बंगलोरचा हा चार सामन्यांतील सलग तिसरा पराभव ठरला.
बंगलोर रॉयल चॅलेंजर्स- जॅक कॅलिस त्रि. नॅनेस ० , रॉबिन उथप्पा झे. सांगवान गो. नेहरा ३ , केव्हिन पीटरसन त्रि. व्हेटोरी ३७ , रॉस टेलर पायचीत मिश्रा ३१ , विराट कोहली झे. दिलशान गो. नेहरा २२ , मार्क बाऊचर झे. मिश्रा गो. सांगवान ३६ , बी. अखिल नाबाद ८ , आर. विनयकुमार धावचीत (डिव्हिलियर्स) ० , पंकज सिंग नाबाद १ , अवांतर ११ , एकूण २० षटकांत ७ बाद १४९. बाद क्रम : १-० , २-१० , ३-७२ , ४-७८ , ५-१३९ , ६-१३९ , ७-१४५. गोलंदाजी : नॅनेस ४-०-२४-१ , नेहरा ४-०-३४-२ , सांगवान ४-०-३२-१ , मिश्रा ४-०-१९-१ , व्हेटोरी ४-०-३५-१.
दिल्ली डेअरडेव्हिल्स - गौतम गंभीर झे. बाऊचर गो. पंकज सिंग १६ , वीरेंद्र सेहवाग झे. पीटरसन गो. पंकज सिंग ७ , दिलशान नाबाद ६७ , ए. बी. डिव्हिलियर्स त्रि. अप्पण्णा २१ , दिनेश कार्तिक झे. कॅलिस गो. अखिल १२ , मिथुन मन्हास नाबाद २३ , अवांतर ४ , एकूण १९.२ षटकांत ४ बाद १५० , बाद क्रम : १-११ , २-४२ , ३-८४ , ४-१०६ , गोलंदाजी : विनयकुमार ३.२-०-२८-० , पंकजसिंग ४-०-३१-२ , जॅक कॅलिस ३-०ृ-३७-० , कुंबळे ४-०-२२-० , अप्पण्णा ४-०-२४-१ , अखिल १-०-८-१.