Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रसंतांच्या जन्मशताब्दीनिमित्त आजपासून विविध कार्यक्रम
नागपूर, २६ एप्रिल / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्या २७ पासून ३० एप्रिलपर्यंत सुभाष मार्गावरील गुरुदेव सेवाश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने कीर्तन, व्याख्यानमाला, महानाटय़, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार, प्राणायाम शिबीर, सामुदायिक

 

प्रार्थना, ग्रामगीतेचे पठण आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
२७ एप्रिलला सकाळी ५ ते ६ प्राणायाम शिबीर, सकाळी ६ वाजता सामुदायिक ध्यान, सकाळी ८ ते १० पर्यंत ग्रामगीता पठण, दुपारी ४ ते ६ पर्यंत भजन, सायंकाळी ६.३० वाजता सामुदायिक प्रार्थना व रात्री ७.३० वाजता ह.भ.प. दिगंबर नाईक यांचे कीर्तन होईल. २८ एप्रिलला सकाळी ५ ते ६ प्राणायाम शिबीर, सकाळी ६ वाजता सामुदायिक ध्यान, सकाळी ७.३० वाजता ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर यांचे ग्रामगीतेवर प्रवचन होईल. यानंतर दुपारी ४ वाजता राष्ट्रसंत विचार व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून ‘ग्रामगीता : सद्यस्थिती व परिवर्तनाच्या दिशा’ या विषयावर डॉ. मदन धनकर त्यांचे विचार माडतील. ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज- एक तत्ववेत्ता’ या विषयावर डॉ. रत्नाकर भेलकर, ‘राष्ट्रसंतके साहित्यका हिंदी साहित्यमें योगदान’ यावर डॉ. दिनकर येवलेकर, ‘दिशाहीन युवकांना ग्रामगीतेची प्रेरणा’ यावर डॉ. दीपक पुनसे, ‘वर्तमान स्थितीत राष्ट्रसंत साहित्य चळवळीचे योगदान’ डॉ. बाळ पदवाड आणि ‘राष्ट्रसंताचा विचार आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळाची चळवळ’ या विषयावर ज्ञानेश्वर रक्षक त्यांचे मत मांडतील. या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर राहतील. यानंतर सायंकाळी ७ वाजता पुरुषोत्तम मिराशी लिखित व विलास कुबडे दिग्दर्शित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र जीवनावर आधारित ‘क्रांतीनायक’ हे महानाटय़ सादर केले जाणार आहे. तुकडोजी महाराजांची भूमिका रमेश लखमापुरे करणार आहेत.
२९ एप्रिलला सकाळी ५ वाजता प्राणायाम शिबीर, सकाळी ६ वाजता सामुदायिक ध्यान, सकाळी ७ ते ९ ग्रामगीता प्रवचन, दुपारी १ ते ४ पर्यंत महिला संमेलन, सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना होईल.
सायंकाळी ७ वाजता ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून संत भानुदास महाराज, कुलगुरु डॉ. एस.एन. पठाण, महापौर माया इवनाते, उपमहापौर किशोर कुमेरिया, डॉ. सतीश पोशट्टीवार, महापालिकेतील सत्तापक्ष नेते अनिल सोले, राष्ट्रसंत जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय भेंडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या समारंभात किसनलाल मुंदडा, दुर्गादास रक्षक, ना.रा. करपे, नारायण पडोळे, रामदास धांडे, डॉ. विठ्ठलराव सावरबांधे, दुर्गासिंह ठाकूर, सदाशिवराव मोहाडीकर, विठोबाजी वाकोडीकर, बापुराव डहाके, देवकाबाई भोयर, रजनी करपे, अंजना कांबळे, दत्तोपंत येखंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.