Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचा वर्धापन दिन
नागपूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचा ६४ वा वर्धापन दिन बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयात साजरा करण्यात आला. याप्रसंगी एआयटीयूसीके आणि एम.एस.ई.बी वर्कर्स फेडरेशनचे मोहन शर्मा, टीचर्स फोरमचे युगल रायलु प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर

 

ईएमबीईएचे उपाध्यक्ष सुरेश बोबाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रत्येकाने ट्रेड युनियनच्या संघर्षांत महत्वाची भूमिका बजावणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन यावेळी प्रमुख पाहुण्यांनी केले. संघटनेचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आतापर्यंत असोसिएशनने अनेक चांगली कामे केली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी असोसिएशनला सवरेतोपरी मदत करावी, असे आवाहन यावेळी केले.
युनियनच्या स्थापना दिन कार्यक्रमात ई.एम.बी.ई.एचे सुधीर कुडुपले, जयवंत गुर्वे, मिलींद वासनिक, रमेश रामटेके, नवनीत माहेश्वरी, रमेश देशपांडे, प्रदीप गौर, विजय खापर्डे, सुरेश सेलूकर, वंदना मुजुमदार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. संघटनेच्यावतीने अमरावती, चंद्रपूर, अकोला जिल्ह्य़ांमध्येही या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी जळगाव जिल्ह्य़ातील चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत अध्यक्ष रामकुमार गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.