Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

शेतीवाडी

नैसर्गिक शेती व पशुपालन फिल्म्स
स्व त:चा एखादा शेतजमिनीचा तुकडा असताना केवळ पुरेशा उत्पन्नाची हमी नाही म्हणून शहराकडे स्थलांतर करावं लागणं हा नाईलाजच. खरं तर बहुसंख्य शेतकऱ्यांना हा मार्ग मनातून पटत नसतो. यावर उपाय म्हणजे उपलब्ध नैसर्गिक साधनस्रोतांचा शक्य तितका वापर करून आपल्या शेताची क्षमता वाढवणं. आज महाराष्ट्रात अनेक छोटेमोठे शेतकरी आपापल्या परीनं वेगवेगळे प्रयोग करून जमिनीचा कस वाढवणं, जलसंधारण करणं असे उपाय योजत आहेत. पण अजूनही या सगळय़ा पद्धती म्हणाव्या तितक्या व्यापक प्रमाणात वापरल्या जात नाहीत, कारण शेतीबद्दलचं परंपरागत ज्ञान मध्यंतरीच्या काळात विस्मरणात तरी गेलं किंवा आधुनिकीकरणाच्या नादात दबलं.

धुळ्यात पिकतेय काळी मिरी
श्री राम सीताराम मराठे (साक्री, जि. धुळे) चार हजार लोकवस्ती असलेल्या मौजे छडवेल. पखरूण गावचे रहिवाशी. कृषी खात्यात नोकरीला होते. विस्तार, बीजगुणण, मृदसंधारण इत्यादी विभागात काम केले. प्रतिनियुक्तीवर ते वनविभागातदेखील काही वर्षे होते. धुळे ते अकोला (विदर्भ) अशा अनेक जिल्ह्य़ात बदल्या झाल्या. ३७ वर्षे नोकरी करून १९९७ मध्ये सेवानिवृत्त झाले.

दुसरी हरितक्रांती आशियात!
जा गतिक तापमानवाढीच्या प्रश्नावर अनेक पातळय़ांवर सध्या अभ्यास व संशोधन चालू आहे. किमान आगामी संकटाची चाहूल लागल्यास काही उपाय योजता येतील, असाच या अभ्यासांचा दृष्टिकोन आहे. सध्या पुढे आलेल्या काही अभ्यासानुसार आशिया खंडात दुसऱ्या हरितक्रांतीला पोषक वातावरण याच तापमानवाढीच्या पाश्र्वभूमीवर येण्याची शक्यता आहे. नव्या हरितक्रांतीची वाट दाखविण्याची क्षमता आशियाई देशांमध्येच असेल व त्यात फिलिपिन्ससारखा देशही असेल असे या अभ्यासाच्या आधारे दिसू लागले आहे.

दूषित दुधाची समस्या
ची नमध्ये दूषित दुधाचा पुरवठा करून सहा मुलांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोघांना फाशीची शिक्षा आणि दूध डेअरीच्या प्रमुखपदी असणाऱ्या महिलेला जन्मठेपेची शिक्षा चीनच्या न्यायालयाने ठोठावल्याची बातमी नुकतीच वाचण्यात आली. सनाळू येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीत या दुधामध्ये प्रथिनाचे प्रमाण वाढले म्हणून त्यात घातक रसायने मिसळली जात असत. हे दूषित दूध प्राशन केल्यामुळे सहा बालके मरण पावली तर तीन लाख मुले व नागरिक आजारी पडले. प्रस्तुत घटनेचे पडसाद फक्त चीनमध्ये नव्हे तर जगभर उमटले होते.

शेंगदाण्याचे लोणी
यु रोप अमेरिकेतील आरोग्याविषयी जागरूक असणारे ग्राहक आपल्या आहारात लोण्याऐवजी शेंगदाण्यांपासून केलेले लोणी वापरतात. भारतीय बाजारपेठेत मात्र पीनट बटर क्वचितच उपलब्ध असते. पाहण्यात येणाऱ्या पीनट बटर ब्रँडची किंमत ३२० रु. प्रति किलोने विकला जातो. शेंगदाण्याचे लोणी आहारात समाविष्ट करण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यात अंँटी ऑक्सिडंटचे प्रमाण चांगले असते. शेंगदाण्यामध्ये पी कॉमरिक नावाचा पदार्थ असतो. हा पदार्थ अँटी ऑक्सिडंटचे काम करतो. शेंगदाण्यातल्या तेलाची भीती बाळगण्याचे कारण नसते. कारण हे तेल मोनोसॅच्युरेटेड या प्रकारातले असते. हे तेल रक्तवाहिन्यात क्लोरेस्ट्रोल जमा करण्यात मोडत नाही असे आहारतज्ज्ञांचे मत आहे.