Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

संवत्सर-कोकमठाण गावांमध्ये गोफण-धोंडय़ाची लढाई सुरू
कोपरगाव, २७ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील संवत्सर व कोकमठाण या दोन गावांदरम्यान आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पहिल्या दिवशी लहान मुले, तरुणांनी गोफण-धोंडय़ाच्या लढाईत भाग घेतला. आज तापमापकातील पारा ४२.५ अंशांवर होता. दुपारनंतर गोदावरी नदीपात्रात योद्धे उतरले.
आजच्या लढाईत कोणीही जखमी झाले नाही. गोदावरीपात्रात ‘म्हसोबाकी जय’ व ‘लक्ष्मीमाताकी जय’चा जयघोष करीत एकमेकांवर चढाई करत होते.
नागपूर-मुंबई हाय-वेवरील वाहनचालक गाडय़ा थांबवून गोफण-धोंडा लढाई पाहत होते.

 

नागरिक, महिलांनी या पुलावरून लढाई पाहिली. उन्हाच्या काहिलीने जीव कासावीस होत होता. अक्षयतृतीया हा सण साडेतीन मुहूतार्ंपैकी मानला जात असल्याने पुरणपोळी, आम्ररस घरोघरी करण्यात आला. पूर्वजांना करा-केळीद्वारे पाणी देण्यात आले. गोफण-धोंडय़ाची लढाई पाहण्यासाठी तिसऱ्या दिवसापासून मोठी गर्दी होते. आज तापमापकाचा पारा ४२.५ अंशांवर गेल्याचे जेऊर कुंभारी येथील हवामान केंद्राचे निरीक्षक नानासाहेब पारवे यांनी सांगितले.