Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कुकडीचे दुसरे आवर्तन ठरल्यावेळी सुटणार - पाचपुते
. श्रीगोंदे, २७ एप्रिल/वार्ताहर

कुकडी धरणातून दुसरे आवर्तन ठरल्याप्रमाणे व पाटबंधारेच्या नियोजनाप्रमाणेच सोडले जाईल,

 

अशी ग्वाही देत वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी मागील आवर्तन १२ दिवस जादा चालले, तरी त्यातून तालुक्यातील तलाव भरून घेतल्याचे स्पष्ट केले.
‘कुकडी’चे अध्यक्ष जगताप यांना पत्रकार परिषद घेऊन वनमंत्री पाचपुतेंनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, घोडमधून दुसरे आवर्तन सोडले आहे. कुकडीतूनही दुसरे आवर्तन सुटेल. पण मागील आवर्तन १० दिवसांपूर्वी बंद झाले. त्यामुळे अधिकारी नियमानुसार दुसरे आवर्तन सोडतील. त्याकरिता येडगावमध्ये वरील धरणातून कसे पाणी आणता येईल, याबाबत जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून हे पाणीही दिले जाईल. मागील आवर्तन १२ दिवस जादा चालले. मात्र, ते पाणी दुसरीकडे कुठेही गेले नाही तर औटेवाडी, लेंडी, घोडेगाव, मोहोरवाडी, पारगाव, कापसेवस्ती या पाझर तलावांसह उक्कडगाव, ढवळगाव येथील तलाव भरून घेताना हंगा नदीत पाणी सोडल्याचे त्यांनी सांगितले. ‘त्यांना स्वप्न पाहण्याचा अधिकार’
राजकीय भूकंपाबाबत जगताप यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष वेधता, पाचपुते यांनी ‘त्यांना स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे’, एवढेच उत्तर दिले.