Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘राष्ट्रवादी युवक’च्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
कोपरगाव, २७ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर शाखेतील वाद चव्हाटय़ावर आला असून कार्यकर्त्यांची

 

हाणामारीपर्यंत मजल गेली. त्यातून शहर संघटक रवींद्र शेलार, आसीफ शेख, सरचिटणीस अमिन शेख, शरद त्रिभुवन यांनी पदाचे राजीनामे देत शहराध्यक्ष संदीप देवकर यांचे नेतृत्व मान्य नसल्याचे स्पष्ट करीत त्यांचा निषेध केला.
राष्ट्रवादी युवकचे सदस्य समीर गवळी यांनी संघटक शेलार यांना काल बसस्थानकावर अडवून धक्काबुक्की व शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर शहराध्यक्ष संदीप देवकर यांनी आपण भांडण मिटवून टाकू असे भ्रमण दूरध्वनीवरून कळवून गवळींच्या घरी शेलारांना बोलवले. गवळी यांच्या घरी गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी व गवळी यांनी माझ्यावर हल्ला चढवून मारहाण केली. देवकर तेथे न आल्याने माझा विश्वासघात केला. त्यांनीच कार्यकर्त्यांंकरवी आपणावर हल्ला केल्याचा संघटक शेलार यांनी निवेदनात आरोप केला आहे.
युवक राष्ट्रवादीत सुरू असलेल्या धुसफुशीबाबत जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी ‘या घटनेची आपणास काहीच माहिती नाही’ असे सांगून कानावर हात ठेवले.