Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

जोडमोहोज येथे विविध धार्मिक कार्यक्रमांस प्रारंभ
पाथर्डी, २७ एप्रिल/वार्ताहर

पाथर्डी तालुक्यातील जोडमोहोज येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह, संत तुकाराम गाथा पारायणास प्रारंभ झाला. दि. ३ मेपर्यंत हा सोहळा चालणार आहे.
भाविकांनी उभारलेल्या श्रीसंत मच्छिंद्रभाऊ स्मृती मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी, राम-सीता-लक्ष्मण व

 

हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. वासुदेवमहाराज मचे यांच्या मार्गदर्शनाखाली, हरिभाऊमहाराज पाटील यांच्या हस्ते हा सोहळा होईल. बुवासाहेबमहाराज खाडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. दि. २ मे रोजी विष्णुयाग होणार आहे. सप्ताहात भागवतानंदमहाराज गिरी, भास्करगिरी महाराज, प्रकाशमहाराज बोधले, महादेवमहाराज राऊत, विठ्ठलमहाराज घुले, आसाराममहाराज बडे, बद्रिनाथमहाराज तनपुरे यांची कीर्तने होणार आहेत. दि. ४ मे रोजी सकाळी ९ वाजता रामरावमहाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होईल. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.