Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राहुरीतील रस्ते वालुकामय
राहुरी, २७ एप्रिल/वार्ताहर

शहरातील प्रमुख रस्ते वाळूमय बनल्याने लहान-मोठे अपघात होत आहेत. वाहनचालक रस्त्याला अक्षरश वैतागले आहेत.
रात्री-अपरात्री मुळा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक केली जाते. वाळू वाहून नेताना बरीचशी

 

वाळू रस्त्यावर पडते. वाळू रस्त्यावर पसरली जात असल्याने लहान-मोठे अपघात होतात. दुचाकीस्वार या वाळूवरून जाताना वाहनासहीत पडतात. वाळू वाहतुकीवर महसूल खात्याचे नियंत्रण नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारींमध्येही वाळूचा थर जमा झाल्याने सांडपाण्याचा निचरा न होता ते रस्त्यावर येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.
महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त होती. आता निवडणुका संपल्याने महसूल खात्याने लक्ष घालण्याची मागणी होत आहे. रात्री १२नंतर पहाटे ५पर्यंत मुळा नदीपात्रातून वाळूची वाहतूक केली जाते. शहरातील कानिफनाथ चौक, कासारगल्ली, विद्यामंदिर शाळा, गणपतीघाट रस्ता, नावघाट रस्ता या ठिकाणी रस्त्यावरील वाळूमुळे अपघात होत आहेत.