Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

स्टोनक्रशरबाबत अहवाल सादर करण्याचा आदेश
नगर, २७ एप्रिल/प्रतिनिधी

सौंदाळे गाव (ता. नेवासे) येथील नर्मदा स्टोनक्रशरमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास

 

उद्भवलेल्या धोक्याबद्दल ६ आठवडय़ांत अहवाल सादर करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (नाशिक) विभागीय अधिकाऱ्यांना दिला.
स्टोनक्रशरची धूळ व आवाजामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो. तसेच, शेतीचे नुकसान होत आहे. उपविभागीय अधिकारी तक्रारीची योग्य दखल घेत नाहीत, असा आरोप करीत सौंदाळे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय रामहरी ठुबे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यासंदर्भात न्यायमूर्ती व्ही. आर. किनगावकर यांनी हा आदेश दिला आहे.
क्रशरच्या मालकाने पुरेशी संरक्षणात्मक उपाययोजना
केली आहे का? मंडळाची परवानगी घेतली आहे का? नागरिकांना कोणता त्रास होतो,
याबाबत अहवाल मागविण्यात आला आहे. ठुबे यांच्या वतीने वकील प्रदीप देशमुख काम पाहत आहेत.