Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९

ज्ञानसाधनामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद..
प्रतिनिधी

पाल्र्यातील साठय़े महाविद्यालय, वांद्रे येथील एमईटी इन्स्टिटय़ूट, माटुंग्यातील वेलिंगकर इन्स्टिटय़ूट, डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालय या ठिकाणी ‘मतदान करा, लोकशाही जगवा’ असे आवाहन तरुणांना केल्यानंतर ‘लोकसत्ता-कॅम्पस मूड कॅम्पेन’ची सांगता ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात झाली. पंतप्रधानपदासाठी वयोमर्यादा हवी का? राजकारण्यांसाठी बुद्धिमत्ता चाचणी ठेवावी का? लोकशाहीबद्दल उदासीनता निर्माण करण्यात राजकारण्यांचा काही वाटा नाही का? सर्वसामान्यांना राजकारणात प्रवेश करायची इच्छा असली तरी घराणेशाहीमुळे ते शक्य होत नाही. सामान्य नागरिकांच्या मनात खदखदत असलेले प्रश्न या ठिकाणीही विचारले गेले व अतुल कुलकर्णी यांनी तितक्याच समर्पकपणे त्यांना उत्तरे दिली..

राजकारणाच्या गप्पांत विरून गेली रिझल्टची चिंता
प्रतिनिधी

‘मतदान करू नये असेच माझे मत होते. ‘लोकसत्ता’च्या या मोहिमेबद्दलची बातमी वाचून उत्सुकतेपोटी अतुल कुलकर्णी यांची मते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. येथे आल्यानंतर मतदान का करायचं? या माझ्या प्रश्नाला उत्तर मिळाले त्यामुळे आता मी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.’- प्रथमेश तांबे.

आम आदमी के साथ..
गुरुदास कामत (काँग्रेस)-

अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवरील बनाना ट्रीज समोर दुपारी चार वाजल्यापासूनच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते जमू लागले होते. उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार बलदेव खोसा यांच्यासह सरचिटणीस नंदकिशोर मसूरकर हे सर्व व्यवस्था पाहत होते. काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांची प्रचारफेरी येथून सुरू होणार होती. काही वेळातच कामत तेथे आले आणि थेट प्रचाररथावर गेले.

प्रचारातही मनसे भाईचारा..
शालिनी ठाकरे (मनसे) -
सकाळी साडेनऊची वेळ. गोरेगाव पश्चिमेला महात्मा गांधी रोडवऱील असलेल्या मिठानगर महापालिका वसाहतीपासून सुरू होणाऱ्या पदयात्रेत शालिनी ठाकरे सहभागी होणार होत्या. त्यामुळे सर्वच मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. प्रचारयात्रेची वेळ जवळ येऊ लागली तसतशी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. तरुणवर्गही मोटारसायकलवर मनसेचा झेंडा लावून सज्ज झाला होता. सव्वादहाच्या सुमारास शालिनी ठाकरेंचे मिठानगरमध्ये आगमन झाले आणि त्यानंतर ‘शालिनी ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’, ‘राज साहेबांचा- नवनिर्माण सेनेचा विजय असो’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

आवाज कुणाचा..
गजानन कीर्तिकर (शिवसेना) -

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,’ अशा घोषणेत अंधेरी पश्चिम येथील मनीषनगरजवळच्या डॉ. केरकर इस्पितळाकडून शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांची प्रचारफेरी निघाली तेव्हा अवघे वातारण भगवे झाले होते. सकाळी साडेनऊपासूनच या प्रचारफेरीसाठी स्थानिक शाखाप्रमुख संजय पवार राबत होते. हळूहळू शिवसैनिक भगव्या टोप्या, उपरणे घेऊन सामील होत होते.

कमळ, हात की शिट्टी.. त्यात आचारसंहितेला बुट्टी!
सोपान बोंगाणे

लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने पालघर मतदारसंघातील प्रचारही आता शिगेला पोहोचला आहे. फेररचनेनंतर भिवंडी, वाडा, शहापूर आणि इगतपुरी हे चार विधानसभा क्षेत्र वगळून त्यात समाविष्ट झालेल्या बोईसर, नालासोपारा, पालघर आणि वसई या नव्या विधानसभा क्षेत्रातील सुमारे सात लाख मतदार यावेळी काय भूमिका बजावतात त्यावरच विजयाचे गणित अवलंबून असल्याचे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चित्र आहे.

रुंदावणारी क्षितिजे..
केंब्रिजमधील अनेक प्राध्यापक डार्विनकडे सपशेल दुर्लक्ष करीत, पण तेथील दोन प्राध्यापक मात्र डार्विनच्या विज्ञानातील रुचीमुळे प्रभावित होऊन त्याचे मित्र बनले.. एक होते वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. जॉन हेन्स्लो.. त्यांनी डार्विनची निसर्ग निरीक्षणातील गती अचूक हेरली व त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत केली.. प्रा. हेन्स्लो चार्ल्सला स्वत:सोबत वनस्पतींचे नमुने गोळा करण्यास घेऊन जात.. डार्विनकडून त्यांनी प्रसिद्ध जर्मन निसर्गशास्त्रज्ञ अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्टची पुस्तके वाचून घेतली.. दुसरे होते भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. अ‍ॅडॅम सेजविक.. त्यांच्याबरोबर चार्ल्स वेल्स परगण्याच्या पदभ्रमण मोहिमेवर रवाना झाला.. प्रस्तर जडणघडणीचा अभ्यास करण्यासाठी अन् जीवाश्मांचा शोध घेण्यासाठी..

मराठी वाहिन्यांचा महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ४९ वा वर्धापनदिन सोहळा जवळ आला आहे. राज्य शासनाबरोबरच विविध संस्था, संघटना महाराष्ट्र दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. त्याचप्रमाणे मराठी वाहिन्याही महाराष्ट्र दिनाचा सोहळा नवनवीन कार्यक्रम सादर करून साजरा करणार आहेत. ई टीव्ही मराठीचा ‘गौरव महाराष्ट्राचा’ हा नव्या दमाच्या गायकांचा रिअ‍ॅलिटी शो याच दिवसापासून सुरू होणार आहे. तर ‘मी मराठी’ वाहिनीच्या दर शुक्रवारी रात्री ९.३० वाजता दाखविण्यात येणाऱ्या ‘पिकनिक रंगे ताऱ्यांसंगे’ या कार्यक्रमात महाराष्ट्र दिनानिमित्त खास भाग सादर होणार असून नेहमीचे मालिका, नाटक अथवा सिनेमातले तारेतारका वगळून अलौकिक व्यक्तीसह पिकनिकला घेऊन जायचा बेत या वाहिनीने आखला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या महापे कार्यालयात महापूजा
प्रतिनिधी

इंडियन एक्स्प्रेस ग्रुपच्या (लोकसत्ता) वतीने महापे कार्यालयात सोमवारी अक्षय्य तृतीयेच्या निमित्त सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आयोजित समारंभात इंडियन एक्स्प्रेस ग्रुपच्या डायरेक्टर वैदेही ठकार, जनरल मॅनेजर बी. आर. टिपणीस, लोकप्रभाचे संपादक प्रवीण टोकेकर, इंडियन एक्स्प्रेस युनियनचे महासचिव अभय करगुटकर व सहसचिव भालचंद्र वराडकर सोबत युनियनचे सल्लागार संजय देशमुख उपस्थित होते. तसेच इंडियन एक्स्प्रेसचे माजी कर्मचारी व ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या बहुचर्चित मराठीचा अभिमान जागवणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी संतोष मांजरेकर यांचा कर्मचाऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

भ्रूणहत्येवर सगुण-निर्गुण चर्चा..
आपल्या लेखणीतून समाजातील दंभ आणि सामाजिक व्यवहारांमधील अर्थहीनता वेशीवर टांगणाऱ्या नाटककार विजय तेंडुलकर ऊर्फ ‘तें’ यांचे ‘शांतता, कोर्ट चालू आहे’ हे नाटक रंगायन या संस्थेने १९६८ साली रंगभूमीवर आणले. अरविंद देशपांडे दिग्दर्शित या नाटकात कु. लीला बेणारे यांची मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुलभा देशपांडे, सतीश दुभाषी, नारायण पै, श्रीकांत लागू यांच्या भूमिका कमालीच्या गाजल्या होत्या. या नाटकांची भाषांतरेही अनेक झाली आणि देश-विदेशामध्येही या नाटकाने विजय तेंडुलकर यांना समर्थ लेखणी असणारा नाटककार म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली.

श्री अक्षरधन त्रमासिक पुरस्कारांचे आज वितरण
प्रतिनिधी
गो. रा. रानडे गौरव समितीने पुरस्कृत केलेले व श्री अक्षरधन त्रमासिकातर्फे दिले जाणारे गो. रा. रानडे ज्येष्ठ शिक्षक आणि समाजसेवक पुरस्कार मंगळवार, २८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता गोखले एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब सभागृह, बोरीवली येथे लोकसत्ताचे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांचे हस्ते प्रदान केले जाणार आहेत. समारंभाचे अध्यक्षस्थान अक्षरधनचे संस्थापक डॉ. रामदास गुजराथी भूषविणार आहेत. पुरस्कार विजेत्यात शोभा ठाकूर (बीमानगर प्राथमिक शाळा), ल. शं. सोळसकर ( आनंदराव पवार विद्यालय), अ. श. भारांबे (भाऊसाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालय), डॉ. अनिला अशोक गद्रे (भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय), शुभांगी अविनाश बाक्रे (आचार्य अत्रे कट्टा) यांचा अंतर्भाव आहे.