Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ओमप्रकाश एम्पाल महापारेषणचे नवीन कार्यकारी संचालक
नाशिक / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ओमप्रकाश

 

एम्पाल यांची थेट निवड प्रक्रियेतून महापारेषणच्या कार्यकारी संचालकपदी (संचालन) नियुक्ती झाली आहे. महापारेषणच्या मुख्य कार्यालयातून याबाबतचा आदेश त्यांना नुकताच प्राप्त झाला.
तत्कालीन राज्य विद्यूत मंडळात १९७९ मध्ये औरंगाबाद येथे चाचणी विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून एम्पाल रुजू झाले. त्यानंतर सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता अशा पदोन्नती घेत एम्पाल ऑगस्ट २००५ मध्ये मुख्य अभियंता झाले.
या पदावर ते अतिउच्चदाब स्थापत्य बांधकाम व सुव्यवस्था, नाशिक परिमंडल येथे रुजू झाले. त्यानतंर आता ते महापारेषणचे कार्यकारी संचालक (संचालन) म्हणून रुजू होत आहे.
एम्पाल यांनी याआधी सांगली, अहमदनगर, चंद्रपूर, औरंगाबाद आदी ठिकाणी विविध पदांवर काम केले आहे. विद्यूत अभियांत्रिकी पदवीसह त्यांनी व्यवस्थापनातील डीबीएम पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. विद्यूत पारेषणची यंत्रणा सक्षम व बळकट करणे, अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारेषणातील अडथळे दूर करणे, पायाभूत विकास करणे, अतिभारित ठिकाणी नव्या उपकेंद्राची स्थापना आदींना प्राधान्य देणार असल्याचे नवे कार्यकारी संचालक (संचालन) एम्पाल यांनी सांगितले.