Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
राज्य

‘पदवीनंतर डीएड’ योजनेवर शिक्षणतज्ज्ञांची लाल फुली!
पुणे, २७ एप्रिल/खास प्रतिनिधी

शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठीची (डीएड) पात्रता बारावीवरून पदवीपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावाला राज्यभरातील शिक्षणतज्ज्ञ-विद्यार्थी प्रतिनिधींनी आज एकमुखाने विरोध केला. डीएडची पात्रता पदवीपर्यंत वाढविल्यास सामाजिक आंदोलन होईलच, शिवाय मुलींसाठीचे अर्थार्जनाचे स्रोत बंद होत गरीब कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. शालेय शिक्षण खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमहोदय राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णयांचे सूतोवाच केले. त्यामध्ये सीईटीला पर्याय शोधण्याची मोहीम, दहावी-बारावीच्या परीक्षारचनेमध्ये आमूलाग्र बदल आदींचा समावेश होता. त्याच्याच जोडीला डीएडची पात्रता बारावीवरून पदवीपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला.

‘वर्षांमान’मुळे सुधारणार भारतातील हवामानाचे अंदाज!
फ्रान्सच्या मदतीने स्वतंत्र प्रकल्प
पुणे, २७ एप्रिल / खास प्रतिनिधी
भारतातील हवामानाचे अंदाज सुधारण्यासाठी आता फ्रान्सची मदत घेण्यात आली असून, तेथील राष्ट्रीय हवामान विभागाच्या (मिटिओफ्रान्स) मदतीने ‘वर्षांमान’ हा प्रकल्प देशात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे आफ्रिका व मध्यपूर्वेतील देशांना फायदा झाला असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागसुद्धा त्याच्या उपयुक्ततेबाबत आशावादी आहे. पावसाचा अंदाज ही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब असली, तरी याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाची कामगिरी फारशी चांगली नाही. त्याची अचूकता वाढविण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘वर्षांमान’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

प्राप्तिकर खात्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लिखीत तक्रार आवश्यक- एम. नरसिंहअप्पा
नाशिक, २७ एप्रिल / प्रतिनिधी
प्राप्तिकर खात्यात होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी करदात्यांकडून लिखीत तक्रार आल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य आयकर आयुक्त एम. नरसिंहअप्पा यांनी येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे आयोजित व्यापारी, उद्योजक, कर सल्लागार, सी. ए. संघटनांचे प्रतिनिधी आणि ग्राहक करदात्यांच्या सभेप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळास दिले.

आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल मोहिते पाटील पिता-पुत्रांविरुद्ध तक्रार
सोलापूर, २७ एप्रिल/प्रतिनिधी

माढा लोकसभा मतदारसंघात ऐन निवडणूक काळात आचारसंहिता लागू असताना मतदानापूर्वी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना कोटय़वधींचे अनुदान वाटप करण्यात आले. हा प्रकार म्हणजे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आमिष दाखविण्याचाच प्रकार आहे. या अनुदानवाटपामुळे आचारसंहितेचा भंग झाला असून याबाबत जिल्हा कृषी खाते, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. जी. मांडुरके यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

राज्यातील ६० हजार अंशत: अनुदानित शाळा कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनाचे अभय
सोलापूर, २७ एप्रिल/प्रतिनिधी
राज्यातील विनाअनुदानित आणि अंशत अनुदानित शाळांमधून काम करणाऱ्या सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांना शासनाने २६ एप्रिल रोजी परिपत्रक काढून पूर्वीची सेवानिवृत्ती योजना लागू केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव दत्तात्रेय सावंत यांनी दिली. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी शासन सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ ही योजना लागू आहे.

विलासराव व शरदरावांकडून कार्यकर्त्यांना ‘वेगळ्या' सूचना?
रत्नागिरी लोकसभा निवडणूक
चिपळूण, २७ एप्रिल/वार्ताहर
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर चिपळुणात काँग्रेस व राष्ट्रवादीमधील नेत्यांचे मनोमीलन घडविले गेले तरी शहरातील कार्यकर्ते मात्र दुखावलेलेच होते. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांनी आपापसातील सुप्त वादाला वाट मोकळी करून दिली. या प्रकारामुळे शहरात काँग्रेस आघाडी बॅकफूटवर गेल्याचे चित्र निकालापूर्वीच दिसू लागले आहे. दरम्यान नारायण राणे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी विलासराव देशमुख यांनी, तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयत्यावेळी कार्यकर्त्यांना वेगळ्याच सूचना दिल्याचीही चर्चा जोर धरत आहे.

चिपळूणमधील वाहतूक कोंडीस भ्रष्ट यंत्रणा कारणीभूत?
चिपळूण, २७ एप्रिल/वार्ताहर
उपाययोजनांच्या अभावामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला असून, पोलीस यंत्रणाही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या ‘मलई’साठी येथील काही पोलीस हवालदार बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडून ‘वन-वे’त शिट्टय़ा मारताना दिसत आहेत. अरुंद रस्ते, वेडीवाकडी लागणारी वाहने, कोलमडलेली सिग्नल यंत्रणा, उदयास नसलेली पार्किंग व्यवस्था आणि त्यातच योग्य नियंत्रणविरहित पोलीस यंत्रणा यामुळे वाहतूक कोंडीने शहराला विळखा घातला आहे. ऐन कडक उन्हात प्रवाशांचा दम या कोंडीत घुटमळत आहे.

कोकणात आजही सुरू आहे अंधश्रद्धेचा बाजार..
जितेंद्र पराडकर
संगमेश्वर, २७ एप्रिल

श्रद्धा ही डोळस असावी, असे नेहमीच म्हटले जाते. श्रद्धा ठेवत असताना ती अंधश्रद्धेकडे झुकू लागली की, तिचा बाजार सुरू होतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात स्थैर्य मिळविण्यासाठी माणूस श्रद्धेच्या माध्यमातून विविध गोष्टी करीत असतो. या प्रयत्नात श्रद्धेचा बाजार करणाऱ्या मंडळींचे चांगलेच फावते. कोकणातील माणसे परंपरावादी व श्रद्धाळू समजली जातात. विज्ञानाने खूप मोठी प्रगती केली असली तरी ती ग्रामीण भागातून ‘डीटीएच’ व ‘मोबाईल’पुरतीच मर्यादित असून अंधश्रद्धा दूर करण्यास त्याचा फारसा उपयोग झालेला नाही.

मंडणगड तालुक्यातील मच्छीमार संकटात!
चिपळूण, २७ एप्रिल/वार्ताहर
मंडणगड तालुक्यातील बाणकोट खाडीत बेकायदा वाळू वाहतूक होत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे बाणकोटलगत असणाऱ्या वाल्मिकीनगर, वेसवी, शिपोळे बंदर लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. आंबेत, म्हाप्रळ पूल ढासळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. या खाडीत सध्या २० बार्जेसद्वारे दररोज वाळू वाहतूक सुरू आहे.