Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नेटवर्क ऑफ मालेगावतर्फे एचआयव्ही रूग्णांचे शिबीर
नाशिक / प्रतिनिधी

जागतिक आरोग्य दिनाच्या पाश्र्वभूमीवर मालेगाव महापालिका, नेटवर्क ऑफ मालेगाव पीपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही. यांच्या सहकार्याने आयोजित एच.आय.व्ही. रूग्णांच्या

 

शिबिरात मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
‘रूग्णालय सज्ज ठेवू, आपत्तकालीन स्थितीत अनमोल प्राण वाचवू’ या घोषवाक्याद्वारे आरोग्यदिनानिमित्त जगाला सामाजिक सुरक्षेचा संदेश देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त जीवन सोनवणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. भरत वाघ, आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. अनिल र्मचट, वैद्यकीय अधिकारी डॉ. हुरनउद्दीन शेख, आधार वृध्दाश्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बेंडाळे, बालसुधा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष
डॉ. राजेश सावंत, नेटवर्क ऑफ नाशिक बाय पीपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही. संस्थेच्या अध्यक्षा प्रिया कांबळे आदी उपस्थित होते.
समाजातील सर्व स्तरातील एच.आय.व्ही. बाधितांनी अशा नेटवर्कच्या माध्यमातून पुढाकार घेतल्याशिवाय समाजाचा एच.आय.व्ही., एड्स रूग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होणार नाही, त्यासाठी संघटीत व्हा, पुढाकार घ्या व स्वतच्या समस्यांचे निराकरण करा, असे आवाहन आयुक्त सोनवणे यांनी केले. यावेळी एच.आय.व्ही. बाधित रूग्णांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेटवर्क ऑफ मालेगाव पीपल लिव्हींग विथ एच. आय. व्ही. चे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, सचिव शकील अहमद मोहंमद मुस्तफा यांच्यासह इतर अनेक जणांनी प्रयत्न केले.