Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नाशिकमध्ये उद्या शिक्षक मेळावा
नाशिक / प्रतिनिधी

विविध मागण्यांसाठी नाशिक शहर शिक्षक लोकशाही आघाडी व नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी येथे शिक्षक, शिक्षकेतर व सेवानिवृत्त

 

कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मविप्र शिक्षण संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी ३ वाजता हा मेळावा होणार असून माजी शिक्षक आमदार जे. यु. ठाकरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार हरिभाऊ शिंदे राहणार आहेत. समारोप संस्थेचे सरचिटणीस आ. डॉ. वसंत पवार हे करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. दिलीप सोनवणे, नाशिक विभाग टीडीएफचे अध्यक्ष डी. एस. पाटील, सचिव व्ही. आर. पानसरे, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर. जे. थोरात, माजी अध्यक्ष शिवाजी निरगुडे, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष कचेश्वर बारसे आदी उपस्थित राहणार आहेत.
शिक्षक-शिक्षकेतर सेवकांच्या जबाबदाऱ्या व सेवाशर्ती नियमावली या विषयावर सतीश नाडगौडा, राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला सहावा वेतन आयोग व हकीम समितीच्या शिफारशी व त्रुटी विषयावर डी. एस. पाटील, उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसर गुफरान अन्सारी यांच्यामार्फत, राष्ट्रीयकृत बँकेत शालेय अकाऊंट व शिक्षक-शिक्षकेतर सेव्हिंग अकाऊंट उघडण्याविषयी आर. जे. थोरात, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी स्तरांवरील प्रलंबित प्रकरणांविषयी आर. डी. निकम हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.