Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

रात्रीचा दिवस ते सकाळचे जॉगिंग
शशिकांत कोठेकर

रात्रीचे दहा वाजत आलेले, कोपरीच्या सिद्धीविनायक सोसायटीत खुच्र्या टाकून कार्यकर्ते वाट पाहत बसलेले. रात्री उशिरा कामावरून घरी परतणारे लोक कोणाचा तरी कार्यक्रम दिसतो म्हणत आपापल्या घरी निघालेले, दहाचे साडेदहा वाजले तरी उमेदवाराचा पत्ता नाही. नंतर कळते की, कोपरीतील एका कार्यकर्त्यांच्या इमारतीत असलेल्या सत्यनारायण पूजेला उमेदवार गेले आहेत. कार्यकर्त्यांची मोबाइलवरून फोनाफोनी सुरू होते.. एव्हाना सद्गुरूच्या मेनगेटसमोर फटाक्यांची माळ लावण्यात दोन कार्यकर्ते गुंतलेले.

दर्शन देवाचे अन् मतदारांचे!
दिलीप शिंदे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कालच्या ठाण्यातील सभेत पलटवार करून त्यांना आव्हान दिल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार विजय चौगुले यांच्या प्रचाराला कलाटणी मिळाली. दिवसाची सुरुवात मोबाइलवरून होणारे अभिनंदन आणि सूचनांनी झाली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी चौकसभा, प्रचारफेऱ्यांमध्ये न गुरफटता त्यांनी कार्यकर्त्यांना वॉर्डनिहाय कामाला लावून प्रमुख कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देण्यावर भर दिला. ठाण्यातील छोटीशी प्रचारफेरी वगळता चौगुले यांनी ऐरोलीत तळ ठोकून बैठकांचा धडाका लावला. त्यातही राज ठाकरे यांच्यावरील टीकेचा प्रभाव प्रकर्षांने जाणवत होता.

लोगों से जुडा हूँ, कभी टुटूंगा नहीं!
जयेश सामंत

वेळ सकाळी साडेसातची.. ठाण्यातील रॉयल किंग हॉटेलमध्ये कार्यकर्ते, स्वीय सहाय्यक, बॉडीगार्ड यांची लगबग सुरू असते. ‘साहेब पहाटे पाच वाजता बैठका संपवून आले आहेत. तुम्ही पाचच मिनिटे थांबा, ते तयार होऊन येतीलच इतक्यात!’ ठाणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांच्या खास मर्जीतील एक कार्यकर्ता सांगत असतो. पहाटे पाच वाजता आले आणि एवढय़ा लवकर उठून तयारही झाले, असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहात नाही. ‘साहेबांचे हे शेडय़ुल काल-परवाचे नाही.

प्रचाराची हंडी अन् गोविंदाची फेरी
भगवान मंडलिक

राष्ट्रवादी-काँग्रेस आणि रिपब्लिकन आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांच्या तिसगाव नाका येथील गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात प्रचारासाठी जमलेल्या महिला आणि तरुण पोरांमधली उत्सुकता शिगेला पोहोचली होती. झोपून डोळे सुजलेले, लालभडक झालेले तरी नसानसात नवचैतन्य. दुचाकी गाडी सुरू करताना एक्सलेटर असे काही पिळायचे की, अरे बाबा आता बस्स कर म्हणून सांगायला लागायचे. असे चैतन्य येथे जमलेल्या तरुणांमध्ये दिसत होते. कारण एकच, डावखरे साहेबांबरोबर लाडका अभिनेता गोविंदाही प्रचारासाठी येणार होता.

शिवसेनेचा आम आदमी!
डोंबिवली/प्रतिनिधी

सकाळी नऊची वेळ. कळवा येथील शिवाजी चौकातून युतीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारफेरीचे स्थानिक शिवसेना शाखेने आयोजन केलेले. साडेनऊ वाजले तरी आनंदरथावर झेंडे लावण्याचे, गाडी सजविण्याचे काम सुरू. शाखेत कार्यकर्त्यांची चहापाण्याची ऊठबस. आदेश देण्याचे काम सुरू. बाजूला नवी मुंबईकडे जाणाऱ्या नोकरी, व्यवसायासाठी निघालेल्या प्रवाशांची वर्दळ, त्याच्या बाजूला बिगारी कामगारांचा दिवसभराच्या रोजीरोटीसाठी भरलेला बाजार. कोणाच्या हातात चहा, कोणाची कामासाठी चाललेली सौदेबाजी.

काँग्रेस को जिताओ, भिवंडी को बचाओ
ठाणे/प्रतिनिधी

दिवसभर ग्रामीण भागातील प्रचार आटोपून सोमवारी सायंकाळी भिवंडीतील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात आलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी- रिपाइं आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांना कार्यकर्त्यांचा वेढा पडला. प्रत्येक कार्यकर्त्यांने आपण काय काय काम केले, याचा लेखाजोखा मांडला. साहेब ग्रामीण भागात पोझिशन चांगली आहे. आदिवासी लोकांना मी विश्वासात घेतलेय, पण त्यांना दारूसाठी पैसे लागतील, साहब अपने मोहल्ले में अच्छा स्थिती हैं, उपस्थितांशी संवाद साधून आणि त्यांना पुढील सूचना देऊन टावरे लगेच घरच्या दिशेने रवाना झाले.

रथ जगन्नाथाचा..
संजय बापट

स्थळ : डोंबिवलीतील दत्तनगरमधील शांतीवन. सकाळच्या नीरव शांततेत देवपूजा करून हॉलमध्ये आलेले सेना-भाजप युतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जगन्नाथ पाटील दोन-तीन निवडक कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते. ही बैठक आटोपताच त्यांनी आपला मोर्चा उपस्थितांकडे वळविला. तेव्हा अगोदरच हजर झालेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला.

रणधुमाळी समाप्त
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्याचा विकास, पायाभूत सुविधा, वाहतुकीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न अशा ठाणे जिल्ह्यातील समस्यांभोवती फिरणारा लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी संपला. राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा होण्याऐवजी गुन्हेगारीच्या आरोप-प्रत्यारोपांचा उडालेला धुरळा एकदाचा खाली बसल्याने मतदारांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर ठाणे जिल्ह्यात लोकसभेचे तब्बल चार मतदारसंघ झाल्याने राज्य व देशपातळीवरील प्रमुख नेत्यांनी ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले. त्यात सोनिया गांधी, नरेंद्र मोदी, शरद पवार, सीताराम येच्युरी, उद्धव व राज ठाकरे, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, आर. आर. पाटील, विनोद तावडे, रामदास आठवले आदी प्रमुख नेत्यांचा समावेश होता. या नेत्यांच्या जोडीने हिंदी, मराठी सिनेमातील नट-नटय़ांनीही हजेरी लावल्याने यावेळी झालेल्या प्रचाराला ‘फिल्मी’ स्वरूपही आले होते. पालघर, ठाणे, कल्याण व भिवंडी या चारही मतदारसंघात बहुरंगी लढती होत आहेत. बसपाचा हत्ती आणि मनसेनेही तीन मतदारसंघांत आपले उमेदवार उतरविल्याने निवडणुकीत वेगळेच रंग भरले. त्यामुळे मतांचे विभाजन कसे होईल, यावरच उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.

मनसे उमेदवाराच्या होर्डिंगवर काळे फासले
ठाणे/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या काल झालेल्या यशस्वी सभेनंतर ठाण्यातील उमेदवार राजन राजे यांच्या होर्डिंगवर कोणा तरी अज्ञात व्यक्तींनी काळे फासल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे विजय चौगुले आणि राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांच्यात थेट लढत असताना मनसेचे उमेदवार राजन राजे यांनी आव्हान उभे केले आहे. त्यांच्या प्रचार सभेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सेना नेते हैराण आहेत. त्यात काल राज ठाकरे यांची सेंट्रल मैदानावरील सभा यशस्वी झाली. त्यामुळे सेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा पाश्र्वभूमीवर कापूरबावडी सर्कलवर लावलेल्या होर्डिंगवरील उमेदवार राजन राजे यांच्या चेहऱ्यावर काळे फासण्याचा प्रकार करण्यात आला. या प्रकरणी मनसेचे शहर अध्यक्ष हरी माळी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. राजे यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकू लागली असून त्या निराशेपोटी हे कृत्य केल्याचे माळी यांनी सांगितले.