Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

खांदेश्वर स्थानकात ‘पे अ‍ॅण्ड पार्क’
पनवेल/प्रतिनिधी

खांदेश्वर रेल्वेस्थानकाच्या परिसरातून होणाऱ्या वाढत्या वाहन चोरींना रोखण्यासाठी सिडकोने ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना राबविण्याचे ठरविले असून त्यासाठी निविदा मागविल्या आहेत. खांदेश्वर स्थानकाच्या वाहनतळात दिवसभर वाहने उभी करून कार्यालय गाठणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे; परंतु या वाहनांच्या सुरक्षेची हमी नसल्याने ती चोरीला जाणे, सुटे भाग पळविणे असे अनेक प्रकार वारंवार घडत होते. हे प्रकार रोखण्यासाठी यापूर्वी एकदा ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ सुविधा सुरू करण्यात आली होती; परंतु कंत्राटदार आणि प्रवासी यांच्यातील वादामुळे ती योजना अल्पजीवी ठरली होती. सिडकोने आता नव्याने निविदा मागविल्याने ही समस्या कायमची सुटेल, अशी आशा प्रवाशांनी व्यक्त केली आहे. मात्र वाहनतळाची जागा सिडको आणि रेल्वेची असल्याने त्यांनी कमी दरात ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चे कंत्राट खासगी व्यावसायिकांना दिल्याने त्याचा भरुदड प्रवाशांनाच बसतो, हा पनवेल स्थानकातील अनुभव जुना नसल्याचे प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले.

सत्तरीचा तरुण कलाकार
प्रतिनिधी

जिथे सागरा धरणी मिळते..हे गाणे लागले की, डोळ्यासमोर अथांग सागराचे चित्र उभे राहते. ज्यांचे आयुष्य या समुद्रावर गेले, त्यांना तर समुद्र खूप जवळचा वाटतो. जगभरातील समुद्रांवर फिरून आलेले मोहिंदर नाथ शर्मा यांचे बालपण पाकिस्तानच्या लाहोरमध्ये गेले. फाळणी झाली आणि शर्मा कुटुंबीय भारतात परतले. नंतर भारतीय नौदलात त्यांनी ३७ वर्षे नोकरी केली. निवृत्तीनंतर तब्बल ४७ वर्षांनी ब्रश हातात घेतला आणि अनेक सागरचित्रांची निर्मिती झाली. हवाई छायाचित्रकार म्हणून त्यांची ओळख ठाणेकरांना आहे. ४७ वर्षांनी त्यांच्यातील चित्रकार जागा झाला आणि त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन ठाण्याच्या निताई गौराज आर्ट गॅलरीत भरले आहे. आयुष्याची ३२ वर्षे समुद्राच्या सान्निध्यात गेल्याने सागरचित्रे हा त्यांच्या चित्रनिर्मितीमधला केंद्रबिंदू राहिला आहे. नौदलाची नोकरी केलेल्या मोहिंदर शर्मा यांनी पृथ्वीच्या पाठीवरील सर्व महासागर पालथे घातले आहेत.
अरबी समुद्र, मेडिटेरिनिअन समुद्र, गल्फचे आखात, बंगालचा उपसागर, काळा समुद्र, लाल समुद्र, अटलांटिक महासागर अशा अनेक सागरांतून शर्मा यांनी प्रवास केला आहे. परदेशातील वास्तव्यात लढाऊ जहाजे, समुद्राची विविध रूपे, जुन्या प्रकारची लढाई जहाजे हे सारे त्यांच्या डोक्यात पक्के बसले होते. त्यांनी काढलेल्या बहुसंख्य चित्रात या प्रतिमा त्यामुळेच अनेकदा दिसतात. अथांग सागरावरील रात्रीचे वातावरण वेगळेच असते. शर्मा यांच्या चित्रातून रात्रीच्या समुद्राचे त्यानी अनुभवलेले रौद्र स्वरूप परिणामकारकरीत्या दिसते. शर्मा यांची चित्रे पाहताना ढगाच्छादित आभाळ, संध्याकाळचे तांबूस आकाश, त्याचे पाण्यातील प्रतिबिंब, समुद्रकिनाऱ्याजवळच्या पाण्याची मातकट छटा, जहाजांना मार्ग दाखवण्यासाठी तरंगत ठेवलेले बॉय हे सारे त्यानी चित्रबद्ध केले आहे. शर्मा यांनी नौदलात नोकरी स्वीकारल्यावर सुरुवातीला खलाशी म्हणून काम पाहिले. एक दिवस विरंगुळा म्हणून ते चित्र काढत बसले होते. केबिनच्या खिडकीतून बोटीचे कप्तान शर्मा यांची चित्रसाधना पाहत होते. त्यांनी शर्मा यांची बदली नंतर नौदलाच्या छायचित्रण विभागात केली. पुढे छायाचित्रकलेचे रीतसर प्रशिक्षण घेतल्यावर हवाई छायाचित्रकार म्हणून ३० वर्षे ते नौदलात होते.ठाण्यात त्यानी एससीएल इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफीची स्थापना केली. छायाचित्रणकलेचे ज्ञान असल्याने त्यांनी काही विविध कोनातून स्थळांचे छायाचित्रण करून नंतर त्यावर चित्रे काढली आहेत. मोहिंदर शर्मा यांच्या चित्रांचे प्रदर्शन निळकंठ हाईटस, पोखरण रोड २ येथील निताई गौराज आर्ट गॅलरीमध्ये भरले आहे. एक मेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले आहे.