Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

युनियन बँक, स्टॅण्डर्ड चार्टर्ड विजेते
सर बेनेगल रामाराव क्रिकेट
मुंबई, २९ एप्रिल / क्री. प्र.

 

अक्षय जांभेकर (नाबाद ८८), राहुल लाड (५५) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या १२५ धावांच्या भागीदारीमुळे युनियन बँकेने देना बँकेवर सहा विकेट्सनी विजय मिळवत रिझव्‍‌र्ह बँक स्पो. क्लब आयोजित ५३ व्या सर बेनेगल रामाराव आंतर बँक क्रिकेट स्पर्धेच्या सीनिअर गटाचे विजेतेपद पटकावले. अ‍ॅन्थनी डायसच्या (१०२) शतकी खेळीनंतर देना बँकेला ४५ षटकांत केवळ २०३ धावांच करता आल्या. ज्युनिअर गटात डावखुरा फिरकी गोलंदाज महेश शेळके याने २३ धावांत सहा बळी घेऊन स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रथम फलंदाजी करताना स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेने २०९ धावांचे लक्ष्य उभारले व या आव्हानासमोर एच. डी. एफ. सी. संघ ३३.३ षटकांत १५७ धावांतच गारद झाला. सीनिअर गटात देना बँकेच्या अ‍ॅन्थनी डायस व प्रशांत सावंत यांनी सर्वोत्तम फलंदाज व गोलंदाजीचे पारितोषिक पटकावले. ज्युनिअर गटात स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या अमर आरते व महेश शेळके यांनी अनुक्रमे सर्वोत्तम फलंदाज व गोलंदाज होण्याचा मान मिळविला. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, रिझव्‍‌र्ह बँकेचे महाव्यवस्थापक अशोक सारंगी व रिझव्‍‌र्ह बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस रामचंद्र पालांडे, सचिव गिरिष साटम यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक- स्टॅण्डर्ड चार्टर्ड २०९ (हर्ष आचार्य ३३, श्रेयस इंदुलकर ४९, संतोष लाखण ३७/३, समीर भातणकर ३०/३) वि. वि. एच. डी. एफ. सी. बँक- १५७ (जितेंद्र नायर ३६, दीपक नायर २८, निरंजन प्रसाद २८, महेश शेळके २३/६, विनय बापट १८/२) सामनावीर- महेश शेळके. देना बँक- २०३ (अ‍ॅन्थनी डायस १०२, सुजीत नायक २५, सुफियाँ रेहमानी २५, परेश ४३/४) पराभूत वि. युनियन बँक ४ बाद २०४ (दीपक राणे २६, अक्षय जांभेकर नाबाद ८८, राहुल लाड ५५) सामनावीर- अक्षय जांभेकर.