Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

कोलकाता नाइट रायडर्स तळाला
दरबान, २९ एप्रिल / वृत्तसंस्था

 

इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्सची वाताहत सुरूच असून बंगलोर रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या लढतीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि गुणतक्त्यात हा संघ तळाला फेकला गेला. त्यांनी आतापर्यंत केवळ एकच सामना जिंकला असून त्यानंतर मात्र सातत्याने त्यांना पराभवाचाच सामना करावा लागत आहे. कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना केलेल्या १३९ धावांना प्रत्युत्तर देताना बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने एक चेंडू व पाच विकेट्स राखून विजय मिळविला.
कोलकात्याला आजही फलंदाजीत सूर सापडला नाही. सलामीवीर ख्रिस गेलने केलेल्या ४० धावा व व्हॅन विकची ४३ धावांची खेळी तसेच वृद्धिमान साहाची २१ धावांची उपयुक्त खेळी या जोरावर कोलकात्याने १३९ धावापर्यंत मजल मारली. पण ही धावसंख्या बचावासाठी पुरेशी नव्हती. त्यातच बंगलोरचे सलामीवीर जॅक कॅलिस (२३) व गोस्वामी (४३) यांनी पहिल्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी करून कोलकात्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर मात्र केव्हिन पीटरसन (१३), विराट कोहली (१९), व्ॉन डर मव्‍‌र्ह (९) यांना अपेक्षित कामगिरी करता न आल्याने कोलकात्याला थोडा दिलासा मिळाला. मात्र बंगलोरचा यष्टीरक्षक मार्क बाऊचर याने जिगरबाज २५ धावा करीत अखेपर्यंत लढा देत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यालाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
कोलकाता नाइट रायडर्स - ब्रेन्डन मॅकक्युलम झे. कोहली गो. पीटरसन ०, गेल झे. गोस्वामी गो. अप्पण्णा ४०, ब्रॅड हॉज पायचीत कुंबळे १७, सौरव गांगुली झे. कॅलिस गो. प्रवीण कुमार १, वॅन विक नाबाद ४३, वृद्धीमान साहा झे. पीटरसन गो. कुंबळे २१, लक्ष्मीरतन शुक्ला पायचीत मव्‍‌र्ह २, अजित आगरकर नाबाद ६, अवांतर ९, एकूण २० षटकांत ६ बाद १३९, बाद क्रम : १-०, २-४५, ३-५४, ४-७०, ५-११०, ६-११८. गोलंदाजी : पीटरसन ४-०-२४-१, मव्‍‌र्ह ४-०-२८-१, पंकजसिंग १-०-१४-०, प्रवीण कुमार ४-०-२५-१, कुंबळे ४-०-१६-२, अप्पण्णा ३-०-३०-१.
बंगलोर रॉयल चॅलेंजर्स - जॅक कॅलिस झे. विक गो. शर्मा २३, गोस्वामी झे. विक गो. हॉज ४३, पीटरसन झे. साहा गो. हॉज १३, कोहली झे. विक गो. हॉज १९, बाऊचर नाबाद २५, मव्‍‌र्ह झे. विक गो. शर्मा ९, मनीष पांडे नाबाद २, अवांतर ९, एकूण १९.५ षटकांत ५ बाद १४३, बाद क्रम : १-६९, २-७७, ३-१०६, ४-१०७, ५-१२९. गोलंदाजी : शर्मा ४-०-१५-२, आगरकर २-०-२३-०, कार्तिक ४-०-२६-०, गेल ३.५-०-३१-०, हॉज ४-०-२९-३, गांगुली २-०-१७-०.