Leading International Marathi News Daily
गुरुवार । ३० एप्रिल २००९

पैज
मैत्रेय : ए, क्या बोलती तू?
रश्मी : ए क्या मै बोलू?
मैत्रेय : सुन..
रश्मी : सुना..
मैत्रेय : आती क्या अमेरिका?
रश्मी : क्या करू आके मैे अमेरिका?

 

मैत्रेय : अरे, घूमेंगे, फिरेंगे, ऐश करेंगे और क्या?
रश्मी : मैत्रेय, पण मी नाही येऊ शकत तुझ्याबरोबर अमेरिकेला?
मैत्रेय : What do you mean!
रश्मी : मी तुझ्याबरोबर अमेरिकेला येणार नाहीये.
मैत्रेय : असं कसं शक्य आहे रश्मी? आता आपलं लग्न झालंय. जेथे राघव तेथे सीता असणारच.
रश्मी : हो, पण सीतेला नोकरी- करिअर नव्हती ना त्यामुळे वनवासात चल म्हटल्याबरोबर वल्कलं नेसून ती गेली रे त्याच्यामागे.
मैत्रेय : मग हे माझ्या सीते, तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्याबरोबर यायला? आणि मी काय तुला रामासारखं वनवासात नेत नाहीये तर अमेरिकेला चल म्हणतोय.
रश्मी : पण तरीही मला नाही यायचंय.
मैत्रेय : अगं, पण का? इतर मुली तर परदेशात जायला एका पायावर तयार असतात. त्यांना ‘फॉरेन’चा नवराच हवा असतो आणि इथं तुला माझ्यामुळे चांगला चान्स मिळतोय तर तुझं आपलं ‘नाही नाही’च चाललंय.
रश्मी : हे बघ, मला परदेशाचं आकर्षण कधीच नव्हतं.
मैत्रेय : don't lie. परदेशाचं आकर्षण नाही, असं होणंच शक्य नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकानं परदेशवारीचं स्वप्न असतंच पण काहीही म्हण हं रश्मी तू बाकी चांगल्या पायगुणाची आहेस हं. आपलं लग्न होतं काय आणि मला ही अमेरिकेला जाण्याची संधी मिळते काय? अगदी स्वप्नातच असल्यासारखं वाटतंय. पुढच्या महिन्याच्या याच तारखेला आपण अमेरिकेत असू.
रश्मी : आपण? अं हं तू. तू एकटा.
मैत्रेय : रश्मी, आता पुरे हं. तू माझ्याबरोबर अमेरिकेला येणार म्हणजे येणार.
रश्मी : सॉरी मैत्रेय, मी यावर खूप विचार करून मगच तुझ्याबरोबर न येण्याचा निर्णय घेतलाय.
मैत्रेय : अमेरिकेला न येण्याचा निर्णय तू तुझ्या नोकरीपायीच घेते आहेस ना?
रश्मी : येस. यू आर राईट.
मैत्रेय : अरे, मार गोली नोकरीको. काय नोकरी नोकरी लावलं आहेस? शिर सलामत तो नोकरी पचास.
रश्मी : मैत्रेय, हे म्हणण्याचे दिवस गेले हं आता. रिसेशन असताना नोकरी सोडणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा ठरेल.
मैत्रेय : रश्मी, अगं तुझ्यासारख्या मुलीला हा विचार करण्याची काहीच गरज नाहीये. तुला काय सहज दुसरी नोकरी मिळेल.
रश्मी : पण तरीही आता ‘असेल ते मिटवा आणि नसेल ते भेटवा’ ही रिस्क घ्यावी, असं तरी मला वाटत नाही.
मैत्रेय : पण मी म्हणतो रश्मी, तुला एवढी नोकरीची गरजच काय? अरे, मैं हू ना. मी पैसे कमवतो. आता तर अगदी डॉलर्समध्ये. मग तू फक्त बसून राहा राणीसारखी.
रश्मी : मैत्रेय, या बाबतीत आपलं लग्नाआधी अगदी स्पष्ट बोलणं झालं आहे आणि नोकरी-करिअर या गोष्टीचं माझ्या आयुष्यातलं महत्त्वही मी तुला स्पष्टपणे सांगितलं आहे. तेव्हा आता या विषयावर चर्चा नको.
मैत्रेय : अगं, लग्न होईपर्यंत मुली असंच सांगतात.
रश्मी : पण मी ‘त्या’ मुलींमधली नाही आणि नोकरी करिअर काय फक्त पैशांसाठीच केली जाते का? कामाचा आनंद, वेगळ्या वाटेवरची वाटचाल, स्वप्नपूर्तीचं समाधान या गोष्टींना काहीच महत्त्व नसतं का?
मैत्रेय : असतं ना. मी कुठे नाही म्हणतो. हे सगळं तू मिळवावसं असंही मला वाटतंय. But not at the cost of our married life. मी अमेरिकेत आणि तू इथं असं वेगळं वेगळं राहणं किती अवघड जाईल.
रश्मी : अवघड तर मलाही जाईल. मी थोडीच अगदी आनंदानं हा निर्णय घेतेय. पण एक बरंय की, वर्षभराचाच प्रश्न आहे. वर्ष कसंही निघून जाईल. मग तू परत येशीलच प्रोजेक्ट संपवून.
मैत्रेय : एक वर्ष बाईसाहेब.. एक वर्ष. एक वर्ष तू एकमेकांपासून लांब राहण्याचा विचार करतेयस. आणि मला तर तुझ्यावाचून एक क्षण म्हणजे एक वर्षांसारखा वाटतोय.
रश्मी : मान्य आहे, पण मग याला उपाय काय?
मैत्रेय : सोप्पाय. तू नोकरी सोडून माझ्याबरोबर अमेरिकेला यायचंस.
रश्मी : मैत्रेय, एक सांगू?
मैत्रेय : अरे, विचार विचार. सगळ्या प्रश्नांची उत्तरं, अडचणींवर उपाय, समस्यांना पर्याय सगळं काही सुचवण्यास मैत्रेय समर्थ आहे.
रश्मी : ओ. के. मग मैत्रेय हा सगळा प्रॉब्लेम निर्माण झालाय तो तुला प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जायला मिळतंय म्हणून? बरोबर? त्यासाठी तू मला अमेरिकेला येण्याचा आग्रह धरतो आहेस. त्यासाठी मला नोकरी सोडायला सांगतो आहेस. बरोबर? मग ज्या तुझ्या नोकरीमुळे हा प्रॉब्लेम निर्माण झालाय ती तुझी नोकरी तूच का सोडून देत नाहीस?
मैत्रेय : You are joking.
रश्मी : No. I am serious.
मैत्रेय : मी नोकरी सोडावी, असं तू म्हणते आहेस?
रश्मी : हो.
मैत्रेय : What rubbish.
रश्मी : रबिश काय त्यात? तू मला नोकरी सोडायला सांगितलीस त्यात तुला काही ‘रबिश’ वाटलं नाही. किती सहजपणे वारंवार उल्लेख केलास या मुद्दय़ाचा.
मैत्रेय : हो मग. तू ‘बाई’ आहेस. मी ‘पुरुष’ आहे.
रश्मी : हो नं. पण माझा पगार तुझ्यापेक्षा जास्त आहे..
मैत्रेय : रश्मी..
रश्मी : सॉरी मैत्रेय, ही गोष्ट पॉइंट आऊट करायची नव्हती मला. त्यावरून तुला दुखवण्याचा तर अजिबातच हेतू नव्हता. फक्त एवढंच सांगायचं होतं की, जसा तू तुझ्या नोकरीच्या बाबतीत सीरियस आहेस ना तशीच आणि तितकीच मीही आहे. नोकरी सोडणं, ही कल्पना जितकी तुला त्रासदायक वाटते ना तेवढीच मलाही वाटते.
मैत्रेय : अगं पण रश्मी, पण एकाला कुणाला तरी तडजोड करावी लागणारच ना! आणि मला एवढी छान संधी आली आहे म्हणून मी तुला नोकरी सोड म्हणालो.
रश्मी : मैत्रेय, अरे एकानं तडजोड करण्यापेक्षा दोघांनी थोडी थोडी करू या. प्रश्न फक्त एक वर्षांचा आहे. आता नोकरी सोडून तुझ्याबरोबर आले तर परत नोकरी मिळेलच याची गॅरंटी काय? मिळालीच तर मनासारखी मिळेल याची गॅरंटी काय? आज माझ्या जॉबमध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे. माझ्या टॅलेन्टला खूप वाव मिळतोय. जिवावर येतंय हे सगळं सोडण्याचा विचार करणं.
मैत्रेय : और मेरा क्या? म्हणजे करिअर आणि नवरा यात करिअरनं बाजी मारली असंच ना!
रश्मी : मैत्रेय, No emotional blackmailing हं! परत एकदा हाच मुद्दा मी तुलाही विचारू शकते. पण त्याला काही अर्थ नाही. आपलं एकमेकांच्या आयुष्यातलं स्थान काय, हे आपल्याला चांगलं माहितेय. जाणीवपूर्वक आपण हे नातं स्वीकारलंय. त्यामुळं त्याला इतर कुठल्याच गोष्टींचा शह बसू शकत नाही, हे तुलाही माहितेय आणि मलाही. त्यामुळं सारखा खुंटा हलवून बळकट करण्याची काहीच गरज नाही. फक्त काही बाबतीत प्राधान्यक्रम महत्त्वाचे ठरतात आणि आपले निर्णयही त्याच्यावर ठरतात. तेव्हा बच्चंमजी तुमचं स्थान माझ्या आयुष्यात अढळ आहे. निर्धास्तपणे अमेरिकेला जा.
मैत्रेय : Yes dear. अगदी मान्य आहे. तू माझ्याबरोबर अमेरिकेला यावसं असं मला खूप वाटतंय. पण तुझीही बाजू मला पटतेय. म्हणूनच मी आग्रह धरत नाही.
रश्मी : देखा, दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए.
मैत्रेय : अशा ‘गोड गैरसमजुती’त तू जरूर राहा.
रश्मी : गोड गैरसमजुतीत? म्हणजे?
मैत्रेय : अगं, तू किती पाण्यात आहेस ते आम्हाला बघायचं होतं..
रश्मी : ‘आम्हाला’ म्हणजे तेच नां सगळे तुझे चहाटळ मित्र?
मैत्रेय : येस. आमची पैज लागली होती. त्यांचं म्हणणं होतं, तू माझ्याबरोबर अमेरिकेला येणार आणि माझं म्हणणं होतं, तू नाही येणार. थोडक्यात, तू तुझ्या मतावर ठाम राहिल्यानं मी पैज जिंकले.
रश्मी : पण मैत्रेय, तुला माझ्या निर्णयाचा राग नाही ना आला!
मैत्रेय : आणि आला तरी काही उपाय आहे का? तू निर्णय बदलणार आहेस का!
रश्मी : ..
मैत्रेय : ए रश्मी, इतका काही चेहरा पाडायची गरज नाहीये. गंमत केली मी तुझी. रश्मी, आपण एक वर्षभर ना, आपलं लग्न झालंच नाही असं समजूया. कोर्टशिपमध्ये आहोत, असं समजून धमाल करू या. नाहीतरी ‘ती’ मजा आपल्याला करायला मिळालीच नाहीये. बघितलं, ठरलं आणि झालं त्याचा वचपा काढूया. लोकं कोर्टशिप आणि मग लग्न करतात. आपण उलटं करूया. आधी लग्न आणि मग कोर्टशिप. काय कशी काय आहे कल्पना.
रश्मी : मस्तय रे! आपण एकमेकांना खूप मेल्स पाठवूया. फोन करू या. असं म्हणतात विरह वेदनाही प्रेमाची लज्जत वाढते.
मैत्रेय : हो गं. म्हणून तर किती तरी गाणी जन्माला आली आहेत. सांग बरं पटकन तुला आठवलेलं पहिलं गाणं..
रश्मी : तू दूरदूर तेथे, हुरहुर मात्र येथे.
मैत्रेय : क्या बात है. अगदी हेच गाणं माझ्याही मनात होतं.
रश्मी : बघ, म्हणजे आपल्या मनाच्या तारा कशा परफेक्ट जुळल्या आहेत..
shubhadey@gmail.com