Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

२४ ऑक्टोबर ९५ च्या खग्रास सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजस्थानच्या जेसलमेर, जोधपूर, जयपूरच्या सहलीला गेले होते. या प्रवासात लक्षात आले की, नावाजलेली यात्रा कंपनी असली तरी बसच्या प्रवासात अगदी जेवणखाणाला थांबतात तेथेही प्रसाधनाची सोय असणे, त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. मग स्त्रियांना आडोसा शोधत कुठे काटे, तर कुठे चिखल तुडवत जावे लागे. हे मला फारच खटकले. तेव्हाच मी ठरवले की, पुन्हा असा प्रवास करताना एखादा फोल्डिंग आडोसा बनवून न्यायचा.
११ जुलै १९९९ ला पुन्हा खग्रास सूर्यग्रहणाच्या निमित्ताने भूज, कच्छ पाहायला गेले. बरोबर एक फोल्डिंग आडोसा स्वत:च करून नेला. पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही. काही वर्कशॉप्सना बनवून द्या म्हटले, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही.
मध्यंतरी ऑगस्ट २००८ ला मी लेह-लडाखच्या सहलीला गेले होते. या सहलीसाठी मी एक फोल्डिंग आडोसा बनवला. तो मात्र सर्वार्थाने यशस्वी झाला. त्याचे वजन जेमतेम एक किलो होते. बॅगेत सहज नेण्यासारखा आणि आटोपशीर. तो बनविण्याकरिता ५०० रुपयेसुद्धा खर्च आला

 

नाही. हा फोल्डिंग आडोसा कितीही वेळा, कितीही वर्षे पुन:पुन्हा वापरात येऊ शकतो. नदीत वा समुद्रात डुंबायला गेलो की कपडे बदलण्यासाठी हा आडोसा उत्तम आहे. परवाच एक कॉलेजकन्या नृत्याच्या स्पर्धेकरिता गेली होती; तिथे कपडे बदलायची सोय नव्हती. तेव्हा तिला या आडोशाची गरज भासली.
हा आडोसा बनवायला मी एक अपारदर्शक कोरी साडी व दोन ब्लाऊज पिसेसचा वापर केला. तळाला जादा साडीची लांबी कमी करण्याकरता मोठे मोठे खिसे तयार केले आहेत. आडोसा वापरताना चार कोपऱ्यांच्या चार खिशांत चार पिशव्यांत घालून दगड ठेवायचे; म्हणजे मग तो वाऱ्याने उडत नाही. चारजणींनी वापरल्यावर जागा बदलायची असेल तर चटकन् दगडाच्या पिशव्या काढायच्या (म्हणजे आडोसा फाटणार नाही) व आडोसा दुसऱ्या जागी हलवायचा.
वरती छपराकरिता एक पाच इंच लाकडी फळीचा चौरस वापरला. त्याला चार वळवलेले हुक्स लावले. त्यामुळे नदीकाठी फांदीला दोरीने हा आडोसा टांगता येतो. या चौरस फळीला खिडकीची तावदाने उघडी राहावीत म्हणून कडय़ा वापरतो, त्याऐवजी (त्या संकल्पनेवर आधारित) मधे अ‍ॅल्युमिनियमच्या १/२ इंच जाडीच्या पावणेदोन फूट लांब पोकळ काठय़ा वापरल्या. त्यामुळे आडोशाचा कर्ण साधारण साडेतीन फूट व लांबी-रुंदी अडीच फूट झाली. या चार काठय़ा कर्णाच्या दिशेनेच राहाव्यात म्हणून फळीवर चार कोपऱ्यांना बारीक पट्टय़ा लावल्या. शिवाय या काठय़ांना धरूनच हा आडोसा उभा करायचा असतो. (एकीने धरायचा असतो. हा वजनाने खूपच हलका असल्याने हात अवघडत नाहीत.) तेव्हा तो फोल्ड होऊ नये म्हणून फळी व काठीला चार कोपऱ्यांत चार भोके पाडून तेथे नटबोल्ट लावायची सोय केली आहे.
या आडोशाच्या दाराकरिता दोन ब्लाऊज पिसेसचा वापर केला व मळू नये म्हणून बाकीच्या तीन भिंतींपेक्षा ते तोकडे ठेवले. या दाराला उंचीच्या मधोमध एक सेफ्टी पिन शिवून ठेवली आहे. म्हणजे कोणाला बंद करायचे असेल तर करता येते. पण त्याची जरूर वाटत नाही.
असा आडोसा भगिनींच्या प्रत्येक ग्रुपने तयार करावा आणि तो प्रवासात सोबत बाळगावा. यात्रा कंपन्यांनी तर प्रत्येक पाच-सहा स्त्री-प्रवाशांना एक या प्रमाणात अवश्य जवळ बाळगावा असा हा फोल्डिंग आडोसा आहे.
रेखा लेले