Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९

मत्स्योद्योगातील क्रांती
नवनवीन समस्या, त्या सोडविण्यासाठी सातत्याने धडपड, प्रचंड लोकसंख्या; परंतु त्यातील प्रत्येकाला कोणता तरी उपयुक्त व्यवसाय मिळवून देऊन आत्मनिर्भर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न! जगात महासत्ता बनण्याचे स्वप्न साकारण्याची क्षमता असलेल्या चीन देशाने अनेक क्षेत्रांमध्ये केलेली प्रगती आश्चर्यकारक आहे. प्रामाणिकपणे, स्वबळावर प्रयत्न करावेत आणि त्यापासून वैयक्तिक, कौटुंबिक स्तरावर उपयुक्त फायदे व्हावेत, कोठे कमतरता, त्रुटी निर्माण झाल्यास शासन सर्वतोपरी मदत करेल, असे सार्वजनिक सूत्र चिनी सरकारने १९८० पासून स्वीकारले. त्याचे सुपरिणाम १९९२ पासून दिसून येऊ लागले आहेत आणि आर्थिक आघाडीवर चीन आता जगात आघाडीवर आलेला आहे. भौगोलिक कमतरतांवर मात करण्याचा चीनने जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये त्याला आशादायक यश काही आघाडय़ांवर मिळाले आहे. यांगत्से या जगप्रसिद्ध महाकाय नदीमार्फत महापूर येऊन दशकानुदशके प्रचंड प्रमाणांवर जीवित-वित्तहानी घडत असे.

फायरफ्लाइज इन द गार्डन
प्रष्टद्धr(२२४)न देखणा,उत्तर फसवे!

पिता-पुत्राच्या नात्यातले सूक्ष्म तणाव मानसशास्त्रानेही मान्य केले आहेत. त्यांच्यातला ताण दूर करू पाहणारा त्यांच्यातला कॉमन फॅक्टर हा बहुधा त्यांना जोडणारी स्त्री हा असतो. पित्याची पत्नी आणि मुलाची आई. आणि त्याचवेळेला बहुतेकवेळा तीच त्यांच्यातल्या सूक्ष्म वैराचे कारणही असते. हे वैर वेगवेगळ्या छोटय़ा छोटय़ा रूपांतून पृष्ठभागावर येत राहते, तेव्हा तो आयुष्याला आणि विशेषत: मुलाच्या व्यक्तिमत्वाला व्यापून राहणारा गंड बनून जातो. पिता-पुत्राच्या नात्यातला हा ताण हाच डेनिस ली दिग्दर्शित ‘फायरफ्लाइज इन द गार्डन’ या चित्रपटाचा विषय आहे. चार्ल्स टेलर हा इंग्रजीचा प्राध्यापक आणि त्याचा मुलगा मायकेल यांच्यातला हा ताण. या दोघांना या नात्याने जोडणारी आहे लिसा (ज्युलिया रॉबर्ट्स) - चार्ल्सची पत्नी आणि मायकेलची आई. भूतकाळाच्या आणि वर्तमानकाळाच्या ताण्या-बाण्यांनी कथा विणली जात राहते. पण चार्ल्स आणि मायकेल एवढय़ापुरताच ताण-तणावांचा हा पट नाही. त्यासाठी कथेतल्या इतरही व्यक्तिरेखांचा नीट परिचय द्यावा लागेल, कारण नाही तर पात्रांच्या या गर्दीत नात्याचा आणि ताणांचा अंदाज नेमका येणे कठीणही जाईल! भूतकाळातला मायकेल आहे दहा वर्षांचा.

‘जोडी जमली रे’मध्ये रामदास-अपर्णा पाध्ये
दर शनिवारी ‘जोडी जमली रे’ या विवाह जुळविण्याच्या अभिनव अशा रिअ‍ॅलिटी शोमध्ये सेलिब्रिटी जोडीला आमंत्रित केले जाते. आजच्या भागात सुप्रसिद्ध बोलक्या बाहुल्याकार रामदास-अपर्णा पाध्ये हे दाम्पत्य सहभागी होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बोलक्या बाहुल्यांचे हजारो कार्यक्रम करून पाध्ये दाम्पत्याने जगभर ख्याती मिळविली आहे. विशेषत त्यांची लिज्जत पापडची जाहिरात तर आजही लोकांच्या चांगलीच स्मरणात राहिली आहे.
बोलक्या बाहुल्यांच्या या अनोख्या विश्वातील गमतीजमती आपल्या अर्धागिनीसोबत रामदास पाध्ये सांगतील. तसेच सहजीवनातला आनंद, जगभरात केलेले दौरे, या दौऱ्यांमध्ये जोडीदाराची झालेली व्यावसायिक मदत यासारख्या गोष्टीही पाध्ये दाम्पत्य ‘जोडी जमली रे’च्या स्पर्धकांना सांगणार आहेत. शनिवारी रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर दाखविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात ‘ट्रेजर हंट’ ही विशेष फेरीही खेळली जाणार आहे. वैवाहिक जीवनातील मूलभूत गोष्टींवर आधारलेल्या या खेळातील स्पर्धकांची कामगिरी पाहून कविता आणि अतुल ही सूत्रसंचालक जोडी स्पर्धकांना गुण देतील. वैवाहिक जीवनातील सुखदु:ख, साहचर्य याबद्दल पाध्ये दाम्पत्य आपले अनुभव सांगणार असून त्यातून स्पर्धकांनाही खूप काही शिकण्यासारखे आहे. जोडीदार ‘डोळसपणे’ निवडताना अर्थातच प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात. त्याबद्दल स्पर्धक जोडय़ा चर्चा करतील. ती चर्चा प्रेक्षकांमधील तरुण-तरुणींनाही नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. ट्रेजर हंट फेरीमध्ये स्पर्धकांच्या अनेक गमतीजमतीही पाहायला मिळतील.
प्रतिनिधी