Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
प्रादेशिक

सरकारने बनावट रेकॉर्ड तयार केल्याचा आरोप हायकोर्टाने फेटाळला
मुंबई, १ मे/प्रतिनिधी

जलसंपदा मंत्री अजित पवार आणि जलसंधारण व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मर्जीतील पाटबंधारे विभागातील एक कार्यकारी अभियंता एन. बी. सोनावणे यांना पुण्यात नेमता यावे यासाठी यासाठी सरकारने बनावट रेकॉर्ड तयार केले, हा आणखी एका कार्यकारी अभियंत्याने केलेला आरोप मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णपणे अमान्य केला आहे. कार्यकारी अभियंता अशोक रामचंद्र कोरे यांनी केलेला हा आरोप केवळ संशय व अंदाजावर आधारित आहे.

इस्लाम जिमखान्याच्या विश्वस्त मंडळाकडूनही कसाबच्या वकिलांचे सदस्यत्व रद्द
मुंबई, १ मे / प्रतिनिधी

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याचे वकीलपत्र घेऊन अ‍ॅड. अब्बास काझ्मी हे इस्लामच्या विरोधात काम करीत असल्याच्या कारणावरुन काही दिवसांपूर्वीच शिया समुदायाने अ‍ॅड. काझ्मी यांचे सदस्यत्व रद्द केले होते. याच कारणावरून आता प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या इस्लाम जिमखान्याच्या विश्वस्त मंडळानेही अ‍ॅड. काझ्मी यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

नवप्रयोगाच्या नावाखाली प्राचीन भारतीय संस्कृतीचा अवमान!
प्रमोद वसंत बापट

जगविख्यात सरोदवादक पं. ब्रिजनारायण यांचे घर म्हणजे संगीताचे अखंड चालणारे अनुष्ठान. पंडितजींची संगीतसाधना जेवढी कठोर आणि डोळस तेवढेच त्यांचे सांगीतिक विचार आणि चिंतनही प्रगल्भ आहे. बोरिवलीतील ‘अत्रे कट्टय़ा’च्या तपपूर्ती सोहळ्यात पंडितजींचे सुश्राव्य वादन आणि जोडीला अभ्यासू विवेचन असा मणिकांचन योग उद्या, रविवारी जुळून आला आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी झालेल्या गप्पांचा हा गोषवारा-

अकरावी प्रवेशात सुसूत्रता आणण्यासाठी शासनाचा पुढाकार!
मुंबई, १ मे / प्रतिनिधी
अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचा दरवर्षी उडणारा बोजवारा टाळण्यासाठी राज्य सरकार येत्या चार पाच दिवसांत धोरणात्मक निर्णय घेणार असून शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिक्षण अधिकारी, संस्थाचालक व शिक्षणतज्ज्ञांसोबत ४ व ५ मे रोजी दोन वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन केले आहे. आयसीएसई, सीबीएसई व एसएससीच्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्यासाठी गुणांमध्ये समानता आणण्यासाठी निश्चित सूत्र ठरविणे तसेच अकरावीचे ऑनलाइन प्रवेश या दोन विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा होणार आहे.

कसाबच्या वयाबाबत अंतिम निर्णय आज
मुंबई, १ मे / प्रतिनिधी
अल्पवयीन असल्याचा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने केलेला दावा त्याच्या दात आणि हाडांच्या चाचणी अहवालात फोल ठरविण्यात आला असून त्याचे वय २० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा अहवाल अभियोग पक्षाने न्यायालयात सादर केला असून तो न्यायालय स्वीकारणार किंवा नाही, याबाबत अंतिम सुनावणी उद्या होणार आहे.

‘इस्कॉन’चा भाईंदरचा भूखंड हायकोर्टाने केला आरक्षणमुक्त
मुंबई, १ मे/प्रतिनिधी

‘रॉयल सोसायटी ऑफ बॉम्बे’च्या विस्तारासाठी म्हणून विकास आराखडय़ात आरक्षित केला गेलेला मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील ‘इस्कॉन’च्या भक्ती वेदान्त ट्रस्टच्या मालकीचा २,५०० चौ. मीटरचा भूखंड आरक्षणातून मुक्त झाल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

मदन बाफना यांना मातृशोक
मुंबई, १ मे / प्रतिनिधी
माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मदन बाफना यांच्या मातोश्री हरकंवर बाफना (८७) यांचे आज दीर्घकालीन आजाराने मावळमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी मावळमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महाबळेश्वर संमेलनातील घडामोडींवर पोलिसांचा अहवाल
मुंबई, १ मे / प्रतिनिधी
वाद-विवादांसह नवनवे विक्रम घडवून महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२ व्या साहित्य संमेलनात आणि त्यापूर्वी घडलेल्या घडामोडींचा समग्र अहवाल पोलीस आणि गुप्तचर विभागाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संमेलनात ज्यांचा सहभाग होता, अशा व्यक्तींचीही चौकशी केली गेली आहे, अशी माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. साहित्य संमेलनाबाबत पोलिसांनी अहवाल देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संदर्भात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि गृहमंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते दोघेही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.