Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९

‘एच१एन१’ म्हणजे?
स्वाईन फ्लू या रोगाला जबाबदार ठरलेल्या या विषाणूला एन्फ्ल्युएन्झा-ए ‘एच१एन१’ हे नाव दिले. पण त्याचा नेमका अर्थ काय? हेमॅग्लुटीन (एच) आणि न्यूरामिनिडेस (एन) हे विषाणूंमध्ये आढळणाऱ्या प्रथिनांचे प्रकार आहेत. पण त्यांचेही उपप्रकार असतात. ‘एच’ प्रथिनांचे सुमारे सोळा प्रकार आतापर्यंत माहीत झाले आहेत आणि ‘एन’ प्रथिनांचे नऊ प्रकार. या दोन प्रकारच्या प्रथिनांमुळेच या विषाणूंना ओळख मिळते. म्हणूनच आताचा स्वाईन फ्लू पसरविणारा हा ‘एच१एन१’! स्वा ईन फ्लू’.. गेले आठवडाभर जगभर याचीच चर्चा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू.एच.ओ.) तर हा संसर्ग जागतिक अरिष्ट बनण्याची (पन्डॅमिक) भीती व्यक्त करून त्याबाबत पाचवी घंटा वाजवली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये सार्स, बर्ड फ्लू या रोगांनी जगभर अस्वस्थता निर्माण केली होती. त्यात आता स्वाईन फ्लूची भर पडली आहे.

महाराष्ट्रातील फिल्म सोसायटीचा आरंभ
१९६० च्या दशकांत महाराष्ट्रातील फिल्म सोसायटी स्थापन करण्याचा पहिला प्रयास पुण्यात झाला. मुंबईतील ‘आनंदम्’ ज्याप्रमाणे बंगाली माणसाने स्थापन केली त्याप्रमाणे मराठीचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातही एका बंगाली माणसाने फिल्म सोसायटी स्थापन केली. रणजित सेनगुप्ता कलकत्त्याहून पुण्यात नोकरीसाठी आला होता. कलकत्ता फिल्म सोसायटीची त्याला पूर्ण कल्पना होती. पुण्यात स्थायिक झालेले दुसरे बंगाली गृहस्थ बी. जे. नाग या दोघांनी मिळून ‘पूना सिने क्लब’ची स्थापना ३ ऑक्टोबर १९६४ ला केली. पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल जी. ओगले पूना सिने क्लबचे पहिले अध्यक्ष. सदस्य संख्या १०० व्हायला १/२ वर्षे लागली. पण सेनगुप्तानी कशीबशी सोसायटी चालविली. पुण्यात तेव्हा मिनी थिएटर नव्हते. त्यामुळे फग्र्युसन, गोखले इन्स्टिटय़ूट, एम.ई.एस. कॉलेजच्या हॉलमध्ये १६ मि.मि. चित्रपट दाखवून सोसायटी वाटचाल करत होती. १९६२ मध्येच पुण्यातल्या प्रभात स्टुडिओत केंद्र सरकारने फिल्म इन्स्टिटय़ूट स्थापन केली होती. तेथून चित्रपट मिळायचे ‘हिरोशीमा-मायलव्ह’, ‘४०० ब्लोज’, इ. चित्रपट दाखवले गेले.

निवडणुकीच्या झगमगाटात विकासाचे लोडशेडिंग
नि वडणुका हा भारतीय लोकशाहीचा आत्मा मानला जातो. प्रारंभीच्या काळात निवडणुका म्हटल्या, की आश्वासनांची खैरात असायची. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि अल्पसंख्याकापासून उच्चभ्रूंपर्यंत सर्वाचेच जीवन सुखकारक कसे होईल, याची आश्वासने निवडणुकीत दिली जायची. निवडणुकीनंतर त्यातील काही पाळलीही जायची, तर काही पुढच्या निवडणुकीपर्यंत राखून ठेवली जायची. कालौघात लोकशाही परिपक्व होत गेली. मात्र निवडणुकीची दशा आणि दिशाही बदलत गेली. आजकालच्या निवडणुकांमध्ये कोरडय़ा आश्वासनांचीही वानवा तर असतेच, उलट आरोप-प्रत्यारोप, झगमगाट आणि पैशाच्या उधळपट्टीत निवडणुका पार पडताहेत. बदलत्या परिस्थितीत कुणी आश्वासनही देत नाही आणि बिच्चारा मतदारही पाच वर्षांतून एकदा घरासमोर येणाऱ्या नेत्याला तुम्ही काय देणार असे विचारत नाही. एकंदरीत सगळा मामला ‘वचने की दरिद्रता’ या उक्तीप्रमाणे चाललेला! पण आता तीही तसदी कोणी घेत नाही. आता निवडणुका म्हटल्या, की आरोप-प्रत्यारोपाला आणि पैशाचा खेळ! या सगळ्यात ज्याच्यासाठी लोकशाही आणि निवडणुकांचा आधार घेण्यात आला, त्या विकासाच्या मुद्दय़ावर निवडणुकांत चर्चाच होत नाही. यंदाची लोकसभा निवडणूकही याला अपवाद ठरली नाही.