Leading International Marathi News Daily

रविवार , ३ मे २००९

क्रीडा

टेस्ट क्रिकेटची ‘टेस्ट’च वेगळी - झुलन
कसोटी क्रिकेट हीच अन्य क्रिकेटची जननी

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार व अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या झुलन गोस्वामीने ट्वेन्टी-२० क्रिकेट संदर्भात ‘लोकसत्ता’शी केलेली खास बातचीत.
महेश विचारे, मुंबई, २ मे

प्रश्न : ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या लोकप्रियतेपुढे कसोटी क्रिकेटला धोका आहे असे वाटते का?
झुलन : अजिबात नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेट हे केवळ मनोरंजनात्मक क्रिकेट आहे. ते कसोटी क्रिकेटची जागा घेऊ शकत नाही. मी स्वत:ही कसोटी क्रिकेटलाच केव्हाही प्राधान्य देईन. शेवटी कसोटी क्रिकेट हीच क्रिकेटची जननी आहे.

..तर डेव्हिस चषकातील माझी कारकीर्द संपुष्टात येईल - ह्य़ुईट
मेलबर्न, २ मे/वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाला डेव्हिस चषक स्पर्धेत भाग घेण्यास बंदी करण्यात आली, तर डेव्हिस चषक स्पर्धेतील माझी कारकीर्द संपुष्टात येईल, अशी भीती लेटन ह्य़ुईट याने व्यक्त केली आहे. भारतात होणाऱ्या डेव्हिस चषकांच्या सामन्यात खेळण्यास ऑस्ट्रेलिया टेनिस संघटनेने सुरक्षिततेच्या कारणास्तव नकार दिला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने ऑस्ट्रेलियावर डेव्हिस चषक स्पर्धेत खेळण्यास बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. हा इशारा प्रत्यक्षात आला तर माझी डेव्हिस चषक स्पर्धेतील कारकीर्दच संपुष्टात येईल, अशी भीती ह्य़ुईट याने आपल्या ब्लॉगवर व्यक्त केली आहे.

डेक्कनला धक्का
पोर्ट एलिझाबेथ, २ मे / वृत्तसंस्था

कर्णधार शेन वॉर्नने दाखविलेल्या विश्वासाला जागत अभिषेक राऊतने केलेल्या २३ चेंडूंतील नाबाद ३६ धावा व आपल्या तडाखेबंद फलंदाजीने चाहत्यांची मने रिझविणाऱ्या युसूफ पठाणची १४ चेंडूतील २ चौकार व २ षटकारांसह सजलेली २४ धावांची खेळी यामुळे राजस्थान रॉयल संघाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आघाडीवर असलेल्या डेक्कन चार्जर्सला पराभवाचा धक्का दिला. डेक्कनचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव होता. याआधी, दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्यांना पराभूत केले होते.

स्वत:शी प्रामाणिक राहिल्यास यश तुमचेच - बापू नाडकर्णी
मुंबई, २ मे / क्री. प्र.

‘स्वत:शी प्रामाणिक राहा, यश-अपयशाची चिंता सोडा. सतत प्रयत्न करीत राहा. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास अपयश येणार नाही, ’ असा मोलाचा आणि अधिकारवाणीचा सल्ला भारताचे बुजूर्ग कसोटीपटू बापू नाडकर्णी यांनी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित युवा क्रिकेटपटूंना दिला.

मुंबई इंडियन्सपुढे बंगळुरू रॉयलचे चॅलेंज
जोहान्सबर्ग, २ एप्रिल/ पीटीआय

कोलकाता नाइट रायडर्सला धूळ चारून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सपुढे उद्या चॅलेंज असेल ते अनिल कुंबळेच्या बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचे. मुंबई तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला असला तरी त्यांना गाफिल राहून चालणार नाही, कारण बंगळुरूच्या संघात कोणत्याही संघाला धक्का देण्याती क्षमता आहे. एकेकाळी तळाला असलेल्या बंगळुरूचा संघ चांगल्याच फॉर्मात येताना दिसत असून कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबला एकामागून एक धूळ चारल्याने ते मुंबईला पराभूत करून विजयाची हॅट्ट्रीक साधण्याच्या प्रयत्नात असतील. जर आजच्या सामन्यात डेक्कन आणि दिल्ली हे दोन्ही संघ पराभूत झाले तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या मुंबईला बंगळुरूला पराभूत करून पहिल्या स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. मुंबईचा संघ फलंदाजीसाठी सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसुर्या यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे. त्याच्यानंतर मधल्या फळीत जे. पी. डय़ुमिनीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आलेली नाही.

कोलकाताला पराभूत करण्याची पंजाबला संधी
पोर्ट एलिझाबेथ, २ मे/ पीटीआय
बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर किंग्ज ईलेव्हन पंजाबच्या संघाला कोलकाताला पराभूत करून विजयाचा मार्गावर परतण्याची नामी संघी उद्या असेल. विजयाची हॅट्ट्रीक साधल्यानंतर बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने काल त्यांचा विजय रथ रोकला होता. कर्णधार युवराज सिंगने आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात हॅट्ट्रीक साधली असली तरी त्याला विजय मिळविता आला नाही, याचे शल्य नक्कीच त्याला असेल. तर कोलकाताचा संघ आणि पराभव यांचे एक अतुट नाते आहे की काय से वाटायला लागले आहे. पंजाबच्या संघात युवराज सिंग ऐन भरात आलेला दिसतोय. फलंदाजीमध्ये कुमार संगकारा तर गोलंदाजीमध्ये इक्बाल अब्दुल्ला चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. तर इरफान पठाण हा संघासाठी हुकमी एक्का ठरत असून अष्टपैलू कामगिरीने त्याने सर्वाची मने जिंकली आहेत. जात असल्याचे दिसत आहे. फलंदाजीमध्ये ख्रिस गेल आणि गोलंदाजीमध्ये इशांत शर्मा हे दोघेच चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. मेंडीसची जादू संपलेली दिसत असून मुरली कार्तिकही छाप पाडू शकलेला नाही.

युवराजचा बळी निर्णायक क्षण ठरला- कुंबळे
डर्बन, २ मे/वृत्तसंस्था
जम बसलेला युवराज बाद झाल्यानंतरच सामना आमच्या बाजूने फिरला, अशी प्रतिक्रिया बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाचा कर्णधार अनिल कुंबळे याने व्यक्त केली. युवराज आणखी पाच षटके जरी खेळपट्टीवर टिकला असता तर किंग्ज पंजाब इलेव्हनचा विजय नक्की होता, असेही तो म्हणाला. सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुंबळे म्हणाला, युवराज बाद झाला तो क्षण आमच्या दृष्टीने निर्णायक ठरला. खेळपट्टीवर चेंडू काहीसा थांबून येत होता. युवराजला बॅटवर झपकन येणारे चेंडू आवडतात हे मला ठाऊक होते. त्यामुळे मी चेंडू वेगात सोडला नाही. ही चाल यशस्वी ठरली. जम बसलेला युवराज आणखी चार-पाच षटके खेळपट्टीवर राहिला असता तरी सामना किंग्ज पंजाब इलेव्हनच्या खिशात गेला असता.