Leading International Marathi News Daily

रविवार , ३ मे २००९

दुर्दम्य संशोधिकेचे शतक!
री टा लेव्ही-मॉन्टॅलसिनी या महान संशोधिकेने नुकतीच म्हणजेच २२ एप्रिल २००९ रोजी आपल्या वयाची शंभरी ओलांडली. वयाची शंभर वर्षे पूर्ण करणारी ती जगातील पहिली नोबेल विजेती ठरली आहे. रीटाचे एका शब्दात वर्णन करायचे झाले तर ते ‘दुर्दम्य’ असेच करावे लागेल. ती नेहमीच तिच्या ध्येयासाठी झगडत आली आहे. आपल्या जिद्दीच्या जोरावर तिने अनेक अडचणींवर मात केली आहे. वयाच्या शंभराव्या वर्षीही ती कृतिशील जीवन जगते आहे आणि म्हणूनच कोणत्याही क्षेत्रात काहीतरी विशेष करून दाखवायची इच्छा असणाऱ्या सर्वानाच ती एक जिताजागता आदर्श ठरली आहे. लहानपणी जवळच्या परिवारातल्या एका व्यक्तीने कर्करोगाने झालेला मृत्यू पाहिल्यावर तिने डॉक्टर बनण्याचा निश्चय केला, पण तिने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याला तिच्या वडिलांचा विरोध होता. गंमत म्हणजे, तिचे वडील स्वत: इलेक्ट्रिकल इंजिनीयर आणि प्रख्यात गणिती होते. असे असूनही, व्यावसायिक शिक्षण हे स्त्रियांच्या पत्नीत्वाच्या आणि मातृत्वाच्या कर्तव्याआड येते, असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे शालेय शिक्षण संपल्यावर तब्बल तीन वर्षे चिकाटीने प्रयत्न केल्यानंतरच तिला त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश आले. आणि मग तिने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.

यासीन मलिक की शादी
का श्मीरचा भूभाग स्वतंत्र करणे, त्यासाठी सर्व मार्गाचा वापर करून अतिरेक्यांना मदत करणे, काश्मीरच्या भारतीय लष्कराच्या अत्याचाराच्या विविध असत्य कथा रंगवून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा मलिन करणे हे जसे पाकिस्तानचे राष्ट्रीय धोरण आहे त्याचप्रमाणे काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांना विस्तृत प्रसिद्धी देणे हे पाकिस्तानी पत्रकार आपले राष्ट्रीय कर्तव्य समजतात. यात अनेकांना मोठी प्रसिद्धी प्राप्त होते, त्यास यासीन मलिक अपवाद नाही. काश्मीरचा स्वातंत्र्ययोद्धा यासीन मलिक, ज्याच्यावर सहा प्राणघातक हल्ले झाले, दोनशे वेळेला त्यास भारताने अटक केली, त्याचे सहाशे सहकारी ठार मारले असे त्याचे वर्णन पाकिस्तानी मीडिया करते.

तालिबानी पाकिस्तान
वैऱ्याची रात्र!

हे न्री आयर्विग या ब्रिटिश इतिहासकाराने अठराव्या शतकात भारतीयांबद्दल केलेली टिप्पणी आज तंतोतंत लागू पडते. आयर्विग लिहितात, की पानिपतच्या मैदानावर देशाचे भवितव्य ठरवणारा घनघोर संग्राम चालू असतानासुद्धा तिथून काही कोस अंतरावरच भारतीय शेतकरी निर्विकारपणे आपले शेत नांगरत असे, याचे परकीयांना आश्चर्य वाटे. ‘लष्कराच्या भाकरी भाजणे’ म्हणजे काहीतरी फालतू काम करणे अशा प्रकारची म्हण मराठीत आहेच. एकूणच संरक्षण किंवा देशाला परकीय आक्रमणाच्या धोक्याबद्दल भारतीय बेफिकीर असतात. शत्रू सरहद्द ओलांडून आला तरी आपण आपापसातले हेवे-दावे मिटवत नाही. फलस्वरुप भारताचा इतिहास म्हणजे रणांगणावरील पराभवांची एक मालिकाच आहे.त्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि इंदिरा गांधी हे दोनच अपवाद इतिहासात आढळतात. परंतु अपवादाने नियमच सिद्ध होतो. १४ एप्रिल रोजी पाकिस्तानी संसदेने स्वात खोऱ्यावर तालिबानी हुकमतीवर शिक्कामोर्तब केले. या विजयाने तालिबानांचे मनोबल आणखी उंचावले आहे आणि संपूर्ण पाकिस्तानवर आपली राजवट आणण्याचे ते उघडपणे बोलत आहेत. तथाकथित शांतता समझोत्यानुसार हत्यारे सरकारजमा करायला त्यांनी ठाम विरोध केला आहे. एक आठवडय़ापूर्वी पाकिस्तानी नॅशनल असेम्ब्लीपुढे वायव्य सरहद्द प्रांताच्या पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केले, की पाकिस्तानच्या सर्व प्रांतात व अनेक शहरात तालिबानी संघटना पोहोचल्या आहेत.

अमेरिकन मंदी
खरी किती, खोटी किती?

भांडवलशाहीचा ‘अंतिम’ विजय झाल्याचा डंका पिटला जात असतानाच अमेरिकेत आर्थिक अरिष्ट आले- इतके भयावह, की त्याची तुलना १९२९ सालच्या महाअरिष्टाशी केली जाऊ लागली. या अरिष्टाची रूपकात्मक तुलना ‘सुनामी’शी करावी लागेल. या आर्थिक सुनामीत बँका, वित्तीय संस्था आणि मध्यमवर्गीयांची घरे व त्याचबरोबर लाखो लोकांच्या नोकऱ्याही वाहून गेल्या. त्याहीपेक्षा विषण्ण अवस्था ओढवली ती बाजारपेठीय भांडवलशाहीचे बेफाम समर्थन करणाऱ्यांवर. त्यांना या अरिष्टाचा ‘अर्थ’ही लागत नाही आणि अन्वयार्थ उमजत नाही. अध्यक्ष बराक ओबामांपासून नोबेल पुरस्कार सन्मानित पॉल क्रुगमनपर्यंत आणि जोसेफ स्टीग्लीझपासून वॉरन बफेपर्यंत सर्व जण या सुनामीचा वेध घेत आहेत; परंतु मूळ प्रश्न विचारायला हवा तो हा, की ही अमेरिकन मंदी खरी आहे, की खोटी? मंदी हाच ‘कॉर्पोरेट कट’ आहे, की ती भांडवलशाहीच्या जागतिक ऱ्हासाची सुरुवात आहे? अमेरिकन मंदीचे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून केलेले विश्लेषण-