Leading International Marathi News Daily

रविवार , ३ मे २००९

खेळ
नाटकाचा प्रयोग ऐन रंगात आला होता. प्रेक्षक प्रयोगात गुंतले होते. हरक्षणी बदलणाऱ्या रंगमंचावरील आभासविश्वासी ते तद्रुप झाले होते. मंचावरील माणसांचा समूह एखाद्या पवित्र विधीत सामील झाल्यासारखा झपाटून गेला होता. समूहाच्या हालचालींचा एक अजोड आकृतिबंध तयार झाला होता. मंचावरला मंत्रित अवकाश कमालीचा भारला होता. बदलणाऱ्या दृष्य चौकटीकडे प्रेक्षक अचंबित होऊन बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. समोर पहिल्या रांगेत मधोमध या रंगमंचावरील समूहाचा कर्णधार डोळ्यात प्राण आणून प्रयोगाकडे लक्ष ठेवून होता. सगळे आखल्याप्रमाणे होते आहे की नाही हे तो बघत होता. तालमीत नक्की केलेल्या जागा नटांना सापडत आहेत की नाही याकडे तो दक्ष होऊन बघत होता. मधूनच त्याचे लक्ष अवती-भोवतीच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्याकडे जात होते.

हरवले ते..
मानव नावाचा प्राणी मोठा उत्सवप्रिय आहे. हो नं ? दु:ख असो की सुख, सोहोळा साजरा करणं ही मानवी प्रवृत्ती आहे आणि म्हणूनच वर्षांचे ३६५ दिवस कसला न कसला दिवसवार नेमलेला आहे. बारा महिन्यातल्या प्रत्येक महिन्यात एक ना एक सण किंवा उत्सव आहेच. आता हेच बघा नं. भिंतीवरल्या कॅलेन्डरची पानं फडफडतात तेव्हा वैशाखातली तृतीया आपल्याला खुणावू लागते. डोक्यावर रणरणतं उन्ह असतं पण, मनाला ‘अखजी’चा ठंडावा साद घालत असतो. ‘अक्षय्य तृतीया’ कृषी संस्कृतीशी नातं सांगणारा सण! दरवर्षी अखजी आली की मनाला हुरहुर लागते.

फिनिक्स भरारी
माणसाला कधी..कुठे.. आणि कसा.. छंद जडेल ते सांगता येणे अशक्यच आहे आणि कल्पना नसतानाही हा छंद जेव्हा त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवत असेल तर मग विचारायलाच नको. पतीच्या आजारपणामुळे काही काळासाठी आलेले नैराश्य दूर करण्याकरता अरूणा खममकर यांनी घेतलेला चित्रकलेचा आधार आज त्यांना ‘लिम्का बुक’पर्यंत घेऊन गेला आहे. चंद्रपूर शहरात वास्तव्यास असणाऱ्या अरूणा खममकर गेल्या २५ वर्षांपासून कलेच्या प्रांतात कार्यरत आहेत. चित्रकला, एम्ब्रायडरी, कृत्रिम फुले, पाककला यांचे वर्ग त्यांनी ऑर्डनन्स फॅक्टरी येथे चालवले आहेत. सोबतच लहान मुलांकरता त्यांनी वेगवेगळे वर्ग चालवले आहेत.

पान टपरी नव्हे पान शॉप
देशात प्रचंड बेरोजगारी असल्याची चर्चा दिल्लीतील राजकारण्यांपासून गल्लीतील पुढाऱ्यांपर्यंत सारेच करतात. अगदी बोळीतील मिसरूढ न फुटलेली पोरंदेखील, आपल्या देशात ना फारच बेरोजगारी असल्याची पोक्त चर्चा करायला मागेपुढे पहात नाहीत. बेरोजगारीमुळे देशात दहशतवादी कारवाया, हिंसाचार, अतिरेकी कृत्ये, चोऱ्या, दरोडे वाढताहेत हेदेखील सारेच सांगत सुटतात. मात्र यावर उपाय काय? हे सांगायला मात्र कोणी धजत नाही वा स्वत: समोर होऊन दोन-चार बेरोजगारांना नोकऱ्या लावून देत नाही.बंडूकाकांचं व्यक्तिमत्त्व मात्र यापेक्षा निराळं होते. कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी आजवर अनेकांची बेरोजगारी यथाशक्ती दूर केली होती, त्यांना नोकऱ्या लावून दिल्या होत्या, त्यांची संसाराची घडी नीट बसवून दिली होती.

मेकअप उतरवल्यावर..!
चेहऱ्याला रंग लावून दिलेली व्यक्तिरेखा आपल्या अभिनयाने जिवंत करणे हे एक संवेदनशील कलाकारच करू शकतो पण, शेवटी अभिनय हा जरा ढोबळ आणि नाटय़पूर्णच असतो. तो म्हणजे त्या कलाकाराला आलेला खराखुरा अनुभव नसतो पण, जर मनाला भिडणारे, अस्वस्थ करणारे, आजूबाजूला घडणारे जाणून घ्यायचे असेल तर त्याला लेखनाशिवाय दुसरा पर्यायच नाही. मृणाल कुलकर्णी या संवेदनशील अभिनेत्रीला अभिनयाच्या प्रांतात यश मिळूनही काहीतरी कमी जाणवत होतं. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तिला भेटणाऱ्या वेगवेगळ्या थरातील व्यक्ती, त्यांचे प्रश्न याने अस्वस्थ होऊन तिला वेगळ्या पद्धतीने व्यक्त होण्याची गरज भासू लागली आणि म्हणूनच हे पुस्तक!

प्रकाशनापूर्वीच पुरस्कार..
सामान्य माणसच काय तर भल्याभल्यांनाही पुरस्कारांचे आकर्षण असते. मोजक्या लोकांना ते नसतेही. म्हणजे असे लोक संतपदाला पोहोचलेले असतात, असेही नव्हे. कारण प्रसिद्धी पराङ्मुख माणसाचे जगणे आणि मोठय़ा लाभासाठी पुरस्कारांना क्षुल्लक किंमत देणाऱ्यांमध्ये निश्चितच फरक आहे. खेळाडू, कलावंत, विद्यार्थी असोत की लेखक प्रत्येकाला स्वत:च्या कृती-कलाकृतीचे कौतुक असते. तिला कुणीतरी मान्यता देतो आहे किंवा तीचा पुरस्कार होतो आहे, ही भावनाच हरखून टाकणारी असते. पुरस्काराचा विचार डोक्यात न धरता वेगळ्या उदात्त हेतूने काम करणारेही अनेक असतात.

युगनायक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भावविश्व आणि जीवनसंघर्षांवर आधारित ‘युगनायक’ हे तीन अंकी नाटक विठ्ठल लांजेवार यांचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यसेवेत ३६ वर्षांनंतर निवृत्त झालेले लेखक विठ्ठल लांजेवार यांनी यापूर्वीही काव्य, कादंबरी, चरित्र, वैचारिक लेखन अशा बहुविध साहित्यप्रकारांमध्ये मुशाफिरी केली आहे. ‘युगनायक’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे चरित्रप्रधान नाटक आहे. त्यांच्या जीवनातील वेचक घटनाप्रसंग नाटकात आलेले आहेत. एकूण तीन अंकात हे नाटक आहे. पहिल्या अंकात संस्कृविषयीच्या संघर्षपूर्ण दृश्यानंतर केळुस्करगुरुजींची भेट, रामजी आंबेडकरांचा मृत्यू वगैरे प्रसंग आहेत.

८ (शनी)
‘जीवाशिवाची भेट घडवणारे शनी महाराज’ जे शाश्वत आहे ते खरे. क्षणभंगुराचा मोह सोडून शाश्वताच्या मागे जा असे शनी सुचवतो. जे क्षणिक आहे ते सोडा असे शनी नेहमीच सांगतो. शनी प्रत्येक गोष्टीची ऋण बाजू दाखवतो. रविच आरोग्य, मंगळाचं सामथ्र्य, बुधाची बुद्धी आणि चंद्राचा हव्यास हे काही टिकून राहणारे नाही. शनी सांगतो मृत्यू ही प्रत्येक अवस्थेची अंतिम अवस्था आहे. साठवण्यापेक्षा आठवण्यासारखे काहीतरी करा. शिक्का फक्त भगवंताचा असतो. इदं न मम-भगवंताप्रीत्यर्थ गोष्टी करा. भावनांचं अप्रूप शनीला कळत नाही. शनी वैराग्य पचवलेला ग्रह आहे. ‘गुरूने जाणलेलं आहे, शनीने पचवलेलं आहे’ जबरदस्त कर्मकठोर आणि रूक्ष असा हा ग्रह आहे. सर्वसामान्य व्यक्तीला पचेल असं न सांगणारा शनी हा ग्रह आहे.

भूखंडाचे शुद्धिकरण.
भूखंडाची निवड करताना जमिनीची परीक्षा करण्याबाबत सांगितलेल्या बाबी आपण गेल्या लेखांकात पाहिल्या. पारंपरिक वास्तुशास्त्रात साधारणत: स्मशानाच्या भूमीवर निवासाचे आणि व्यवसायासाठीचे बांधकाम केले जाऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी वारंवार सुचवले आहे. त्यामुळे आपण खरेदी करणार असलेल्या भूखंडात किंवा जमिनीवर मानवाची किंवा अन्य प्राण्यांची हाडे सापडू नयेत, हे प्रकर्षांने बघायला हवे. यासंदर्भात पारंपरिक वास्तुशास्त्रात जे फल-विधान सांगण्यात आले आहे, त्यानुसार जमिनीत गायीची हाडे सापडत असतील तर त्या जमिनीवर घर बांधून राहणाऱ्याला राजभय असते. कुठलेही बालंट अंगावर येऊन अशा लोकांना कारागृहाची हवा खावी लागू शकते किंवा कोर्ट-कचेरीची प्रकरणे मागे लागतात, असे सांगितले आहे.

दिल्या घरी सुखी
अस चंद्राराणी!

परवा मुग्धाच्या लग्नाला गेले. कालपर्यंत या वसाहतीमधून त्या वसाहतीमध्ये उडय़ा मारीत ही खेळत होती. खेळता खेळता ही कधी मोठी झाली हे कळले नाही. आज नवरीच्या पोशाखात तिला पाहताना हृदय भरून आलं.. सुलग्न लावण्यासाठी मी तिच्याकडे वळले, तेव्हा ती नववधू म्हणाली, ‘ताई मला पक्की खात्री आहे की, तुम्ही या लिफाफ्यामध्ये माझ्यासाठी सुंदर कविता आणली असणार.. आज मला पैसे नको, गीत हवे..’ मी क्षणभर गोंधळले. मला तिचा जीवन-भाव ओतप्रोत वाटला.. या भावामुळे तिचा सजलेला सुंदर चेहरा अधिकच आकर्षक दिसू लागला. मी कौतुकाने तिच्याकडे पाहतच राहिले..