Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

गडचिरोलीत खत विक्रेत्यांचे संमेलन
गडचिरोली, २ मे / वार्ताहर

राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर लिमिटेडच्यावतीने खत विक्रेत्यांचे संमेलन पत्रकार भवनात नुकतेच झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस.एस. मुंडरे

 

हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘आर.सी.एफ.चे जे.के. राठोड, कृषी विभागाचे मोहीम अधिकारी पी.एन. येरगुडे, सुनील पाटील उपस्थित होते.
यावेळी जे.के. राठोड म्हणाले की, विक्रेत्यांनी येणाऱ्या काळामध्ये युरीयाच्या टंचाईची जाणीव ठेवून कंपनीचे इतर उत्पादन सुजला, मायक्रोला, बायोला यांचा वापर करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे.
खताच्या व्यवस्थेबद्दल विपणन प्रबंधक सुनील पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले. सहाय्यक विपणन प्रंबधक पाठक यांनी वित्तीय सेवा व ‘सॅप’ संगणक पद्धतीबाबत माहिती दिली. कृषी विकास अधिकारी मुंडरे यांनी जिल्ह्य़ातील आदिवासी शेतकऱ्यांना खताची टंचाई जाणवू देऊ नये, तसेच मागणीनुसार व आवश्यकतेनुसार खते एम.आर.पी. दरात पुरवावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रमोद मांडवकर यांनी केले. आभार पणन व्यवस्थापक चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्य़ातील आर.सी.एफ.चे विक्रेते उपस्थित होते.