Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

गोंदियात जैन कलार समाज मंदिराचे लोकार्पण
गोंदिया,२ मे / वार्ताहर

जैन कलार समाज भवन मंदिराचे लोकार्पण नुकतेच येथे झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन

 

पोलीस निरीक्षक सुधाकर पालांदूरकर यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रेमलाल रहमतकर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर मध्यवर्ती मंडळाचे संचालक काशिनाथ सोनवाने, दुधराम भांडारकर, नारायण सोनवाने, भैयालाल मोरघडे, युवराज सोनवाने, अध्यक्ष दाजीबा मानापुरे आदी उपस्थित होते.
समाजाचा खरा विकास साधायचा असेल तर महिला व तरुणांनी पुढे येऊन आपली जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन सुधाकर पालांदूरकर यांनी यावेळी केले.
मार्च २००९ पर्यंतच्या खर्चाची माहिती, नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड, समाज भवनाच्या बांधकामासंबंधी विचार, विशेष सभासद नोंदणी मोहीम आदी विषयांवर आमसभेत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी नारायण सोनवाने यांच्याहस्ते कुपनलिकेचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन युवक समितीचे सचिव महेंद्र सोनवाने यांनी केले. प्रास्ताविक सुखराम खोब्रागडे यांनी केले.
या लोकार्पण कार्यक्रमाला सुखराम खोब्रागडे, दाजीबा मानापुरे, भगवती लिचडे, ललित मुरकुटे, युद्धिष्ठीर मोरघडे, राजा इटाणकर आदीं उपस्थित होते.