Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

लाखनीत आज सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन
भंडारा, २ मे / वार्ताहर

जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळाच्यावतीने भंडारा जिल्ह्य़ातील लाखनी येथे

 

उभारण्यात आलेल्या जैन कलार समाज सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन ३ मे रोजी सकाळी ९ वाजता नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यमंत्री नाना पंचबुधे, आमदार सेवक वाघाये, केशव मानकर, आशीष जयस्वाल, सहकार नेते रवींद्र दुरुगकर, उद्योगपती बसंतलाल शॉ राहणार आहेत.
लोकार्पण सोहोळ्यानंतर सामूहिक विवाह सोहोळा होणार असून यात विवाहबद्ध होणाऱ्या १० जोडप्यांना व्हिडीओकॉन कंपनीचा टीव्ही संच भेट देण्यात येणार आहे.
या सोहोळ्यास गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, बालाघाट, छिंदवाडा या जिल्ह्य़ातून समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.