Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

शेकडो कर्मचारी मतदानापासून वंचित
चांदूर रेल्वे, २ मे / वार्ताहर

निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले शेकडो कर्मचारी अद्यापही आपला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित आहेत.
कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत

 

कार्यवाही करण्याची मागणी चांदूर रेल्वेचे नगराध्यक्ष गणेश रॉय यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
गेल्या १६ एप्रिलला मतदान पार पडले. धामणगाव विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना धामणगाव, वरुड-मोर्शी भागामध्ये केंद्राध्यक्ष व निवडणूक अधिकारी म्हणून आदेश देण्यात आले आहे.
निवडणूक कार्यात सहभागी कर्मचाऱ्यांचे टपाल मतदानासाठी आवेदन पत्र भरून घेण्याचा निवडणूक आयोगाचा नियम आहे. मात्र, १५ दिवस उलटले तरी चांदूर रेल्वे भागातील सुमारे दोन हजार कर्मचारी ते अद्यापही आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित आहे.
यासंदर्भात चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता आम्ही सुमारे अकराशे कर्मचाऱ्यांजवळून आवेदनपत्र भरून घेतल्याचे त्यांनी सांगितले.