Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

खिचडी शिजवण्याचे अनुदान शाळांना मिळालेच नाही
वरूड, २ मे / वार्ताहर

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मध्यान्ह खिचडी भोजन योजनेचे ४

 

महिन्यांचे अनुदान जिल्ह्य़ातील पंचायत समित्यांना आले आहे. मात्र, ही रक्कम अद्यापही शाळांना मिळाली नाही.
डिसेंबर २००८ ते मार्च २००९ या ४ महिन्यांचे खिचडी शिजवण्याचे मानधन शाळांना मिळाले नव्हते. वृत्तपत्रांमध्ये या आशयाचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर या ४ महिन्यांचे वर्ग १ ते ५ आणि वर्ग ६ ते ७ चे खिचडी शिजवण्याचे मानधन प्राप्त झाले आहे. गेल्या ५ महिन्यांपासून अनुदान रखडल्याने खिचडी कशी शिजवावी हा प्रश्न शाळांना पडला होता. दुकानदारही उधारीसाठी तगादा लावून होते. अखेर अनुदान तालुका पातळीवर आले, ते शाळांना त्वरित देण्याची मागणी होऊ लागली आहे.
व्यक्तिमत्त्व विकास शिबीर
हातुर्णा येथील अरविंद सोहम आश्रमतर्फे ५ ते १४ मे दरम्यान व्यक्तिमत्त्व व सुसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.सहभागासाठी तानसेन निकम (९३२६९६०८८८), उमेश निंभोरकर (९४२२८५८११४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.