Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

बाबा आमटे गुणवत्ता पुरस्काराचे वाटप
ब्रह्मपुरी, २ मे / वार्ताहर

स्थानिक जिल्हा परिषद (माजी शासकीय ) विद्यालयात बाबा आमटे गुणवत्ता शिष्यवृत्ती व आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. प्रारंभी

 

सावित्रीबाई फुले व बाबा आमटे यांच्या प्रतिमांना मुख्याध्यापक सी.जी. मून, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सी.जी. मून यांनी बाबांच्या नावाने सुरू झालेल्या गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे महत्त्व पटवून दिले. २००८-०९ मधील तीन विद्यार्थ्यांना बाबा आमटे गुणवत्ता शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यामध्ये चांगदेव रामचंद्र ठाकरे, प्रथम १५०१ रुपये, आकाश उत्तम चहांदे- द्वितीय १२५१ रुपये, आशीष भीमराव मेश्राम, तृतीय १००१ रुपये यांचा समावेश आहे. दिवं. बाबा आमटे आर्थिक सहाय्य योजना पुरस्काराचे वाटप पुढील शिक्षणासाठी इयत्ता १० वी पास व दारिद्रय़ रेषेखालील पालकांच्या पाल्यांना प्रत्येकी रुपये २०००/- याप्रमाणे करण्यात आले. यामध्ये चांगदेव रामचंद्र ठाकरे, आकाश उत्तम चहांदे, आशीष भीमराव मेश्राम, रोषणा अरुण तोंडरे, सचिन आसाराम तुपट यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार आर.पी. काळबांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका व कर्मचारीवंृदांनी अथक परिश्रम घेतलेत.