Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मोहाडी (मो.) येथे बुद्ध विहाराचे लोकार्पण
ब्रह्मपुरी, २ मे / वार्ताहर

भारतीय बौद्ध महासभा शाखा मोहाडी (मोकासा) च्यावतीने येथील बुद्ध विहार लोकार्पण

 

आणि बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहोळा पार पडला.
ही बुद्धमूर्ती येथील रहिवासी प्रा. ताराचंद खोब्रागडे यांनी बुद्ध विहाराला दिली आहे. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोतराव कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. एन.एस. कोकोडे, प्रा. बाळ गजभिये, रंजना चोले, प्रा. ताराचंद खोब्रागडे, रामकृष्ण खापर्डे, लीला खापर्डे, रामभाऊ गेडाम व जांगडे आदी हजर होते.प्रारंभी पंचशील, ध्वजारोहण भन्ते आनंद यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर भन्ते अश्वघोष (ब्रह्मपुरी) व भन्ते ज्योती (रामदिघी) बुद्ध वंदना घेऊन बुद्धमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.
यावेळी पाहुण्यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक गजभिये, हिरालाल गेडाम, अनमोल बन्सोड, राजू गजभिये, अनिल बन्सोड, संजय बन्सोड, भारत गेडाम, मोसम गेडाम, देवेंद्र गेडाम, नागसेन खोब्रागडे व पवन खोब्रागडे आदींनी सहकार्य केले.