Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

अमरावती शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी तिसरी आघाडी
वरुड, २ मे / वार्ताहर

अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत बँक बचाव आघाडी

 

स्थापन करून तिसऱ्या आघाडीचे पॅनेल रिंगणात उतरवण्याबाबत अमरावतीत काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींचे नुकतेच एकमत झाले, असे बहुजन शिक्षक परिषदचे जिल्हाध्यक्ष विद्याधर इंगळे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
बहुजन शिक्षक परिषद डॉ. पंजाबराव देशमुख, राष्ट्रीय शिक्षक परिषद, आदिवासी शिक्षक संघ या तीन शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींचे चर्चासत्र नुकतेच झाले. या तीनही शिक्षक संघटनांचे तिसऱ्या आघाडीचे पॅनेल निवडणुकीत उतरवण्याबाबत चर्चा केली.इतरही काही संघटना या आघाडीत सामील होणार असल्याचा दावा विद्याधर इंगळे यांनी केला.
या चर्चासत्रात विद्याधर इंगळे, प्रभाकर झोड, सुनील तुंबडे, प्रकाश विंचूरकर, सुधीर गुल्हाने, अशोक कु ऱ्हाडे, प्रेमलाल भिलावेकर, मनोहर धरत, संतु बेठे, सिद्धार्थ रामटेके, विनोद टेंभे, प्रशांत पाचपोर, राजू बोंडे, एच.पी. मांडवे, अजित पाटील, सुरेश खंडारे, संजय वानखडे, मनोहर पखाले, विजय खोडस्कर, संजय खाडे, राजेंद्र नकाशे, संजय बेले सहभागी झाले होते.