Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित; दूरध्वनी सेवाही बंद
नरखेड, २ मे / वार्ताहर

थकित वीज देयकामुळे वीज वितरण कंपनीने नरखेड तहसील कार्यालयातील

 

वीजपुरवठा खंडित केल्यामुळे कर्मचारी लाभार्थी व विद्यार्थी यांची उन्हाळ्यात चांगलीच परवड होत असून येथील दूरध्वनी सेवाही खंडित झाली आहे.
याबाबत तहसीलदार एस.के. अवघड यांना विचारणा केली असता संबंधित विभागाकडून निधी मिळत नसल्यामुळे नरखेड तहसील कार्यालयावर हा प्रसंग ओढवला असल्यामुळे त्यांनी आजच्या घडीला कार्यालयावर वीज देयकाचे ३३,७७० रुपये थकित असून दूरध्वनीचे बिलही थकित असल्याने दूरध्वनी सेवा खंडित झाली आहे. त्यामुळे खाजगी भ्रमणध्वनीवरून वरिष्ठांशी संपर्क साधावा लागतो, असेही ते म्हणाले. कार्यालयाच्या वार्षिक अंदाजपत्रकानुसार वीज देयक १ लक्ष, दूरध्वनी देयक १ लक्ष, पेट्रोल, डिझेल १५ हजार, जीप दुरुस्ती ५० हजार, स्टेशनरी ५० हजार, मजुरी १५ हजार, झेरॉक्स व इतर खर्चासाठी ७५ हजार, पालिका कर ३५,९३० रुपयांची मागणी करूनही पूर्ण रक्कम मिळाली नाही. कार्यालयीन खर्चासाठी ७२ हजार, मजुरी ४,७५० व पालिका कर ३४५० रुपये कार्यालयाला प्राप्त झाले असल्याचे कळते.