Leading International Marathi News Daily

रविवार , ३ मे २००९

गडचिरोलीत खत विक्रेत्यांचे संमेलन
गडचिरोली, २ मे / वार्ताहर

राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर लिमिटेडच्यावतीने खत विक्रेत्यांचे संमेलन पत्रकार भवनात नुकतेच झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस.एस. मुंडरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘आर.सी.एफ.चे जे.के. राठोड, कृषी विभागाचे मोहीम अधिकारी पी.एन. येरगुडे, सुनील पाटील उपस्थित होते.

गोंदियात जैन कलार समाज मंदिराचे लोकार्पण
गोंदिया,२ मे / वार्ताहर

जैन कलार समाज भवन मंदिराचे लोकार्पण नुकतेच येथे झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सुधाकर पालांदूरकर यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रेमलाल रहमतकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर मध्यवर्ती मंडळाचे संचालक काशिनाथ सोनवाने, दुधराम भांडारकर, नारायण सोनवाने, भैयालाल मोरघडे, युवराज सोनवाने, अध्यक्ष दाजीबा मानापुरे आदी उपस्थित होते.
समाजाचा खरा विकास साधायचा असेल तर महिला व तरुणांनी पुढे येऊन आपली जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन सुधाकर पालांदूरकर यांनी यावेळी केले.

लाखनीत आज सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन
भंडारा, २ मे / वार्ताहर

जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळाच्यावतीने भंडारा जिल्ह्य़ातील लाखनी येथे उभारण्यात आलेल्या जैन कलार समाज सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन ३ मे रोजी सकाळी ९ वाजता नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यमंत्री नाना पंचबुधे, आमदार सेवक वाघाये, केशव मानकर, आशीष जयस्वाल, सहकार नेते रवींद्र दुरुगकर, उद्योगपती बसंतलाल शॉ राहणार आहेत.

अकोल्यात भाजप पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
घातपाताचा आरोप

अकोला, २ मे / प्रतिनिधी

भाजपचे अकोला शहर सचिव श्याम गुरबानी (३५) यांचा शनिवारी संशयास्पद मृत्यू झाला. हिंगणा फाटय़ाजवळ कारमध्ये गुरबानी मृतावस्थेत आढळले. त्यांचा घातपाताने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला असून या घटनेमुळे अकोला शहरात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षात गेली अनेक वर्षे सक्रिय असलेल्या श्याम गुरबानींच्या मृत्यूने राजकीय व व्यापारी वर्तुळ हादरले आहे.

इंग्रजी शिकलात तर देशाचे राजे व्हाल- डॉ. कांचा इलाया
‘समता पर्व २००९’ची सांगता
यवतमाळ, २ मे / वार्ताहर
‘इंग्रजी शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही जर इंग्रजी शिकलात तर देशाचे राजे व्हाल! संपूर्ण देशात इंग्रजी माध्यमांच्या आणि केवळ सरकारच्याच शाळा असाव्यात. त्यात सर्वानाच मोफत शिक्षण मिळावे, असे मत हैदराबाद येथील विचारवंत डॉ. कांचा इलाया यांनी ‘समता पर्व २००९’च्या समारोपीय सत्रात अध्यक्ष म्हणून बोलताना व्यक्त केले.

बल्लारशाह प्लायवुड कारखाना पूर्ववत सुरू होण्याची चिन्हे
चंद्रपूर, २ मे / प्रतिनिधी
सहा महिन्यांपासून बंद असलेल्या बल्लारशाह प्लायवुड कारखाना व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने आता हा कारखाना पूर्ववत सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर असलेला बल्लारशाह प्लायवुड कारखाना गेल्या १२ नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आला होता. यामुळे या कारखान्याच्या स्थायी व अस्थायी स्वरूपात नोकरीवर असलेल्या ४०० कामगारांच्या कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रतिनियुक्त अधीक्षकावर रुग्णालयाचा कारभार
नरखेड, २ मे / वार्ताहर
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना अतिदक्ष सेवेसाठी नागपूर गाठावे लागत आहे.येथील रुग्णालयाचा कारभार प्रतिनियुक्तीवर असणारे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व दोन वैद्यकीय अधिकारीच सांभाळत आहेत. या रुग्णालयात अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांची जागा रिक्त आहे. रुग्णालय स्थापनेपासून दोनच वैद्यकीय अधीक्षकांचे दर्शन नरखेडवासीयांना झाले. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची या रुग्णालयात आवश्यकता असूनही कधी दोन तर कधी एक अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत येथील कारभार चालवून शासनाने रुग्णांच्या जीवाचा खेळखंडोबा केल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.

गोंदियात १० मे रोजी राष्ट्रीय कविसंमेलन
गोंदिया, १ मे/ वार्ताहर

भारतीय नवयुवक छात्रोत्थानच्या वतीने १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात राष्ट्रीय कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कविसंमेलनात माजी खासदार प्रा. ओमपालसिंग निडर (आगरा), प्रल्हाद नवीन (चितौडगढ), डॉ. शशी शुक्ला (कानपूर), प्रा. यशपाल यश (फिरोजाबाद), सुरजीत नवदीप (धमतरी) आदी कवी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बी.एस. जुनेजा, उपाध्यक्ष डॉ. हिरालाल जैस्वाल, अ‍ॅड. अनिता शर्मा, अशोक सहारे, जलील खान पठाण, हितेंद्र बिसेन, शैलेष जायस्वाल, महेश करियार,अनिता शर्मा, प्रयत्नशील आहेत.

‘रासेयो’च्या विभागीय समन्वयपदी खानोरकर
ब्रह्मपुरी, २ मे / वार्ताहर

स्थानिक ने.हि. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व ‘रासेयो’ कार्यक्रमाधिकारी प्रा. धनराज खानोरकर यांची चंद्रपूर जिल्हा विभागीय समन्वयकपदी कुलगुरुंनी नुकतीच निवड केली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. प्रा. धनराज खानोरकर हे मागील पाच वषार्ंपासून ‘रासेयो’ कार्यक्रमाधिकारी आहेत. त्यांनी महाविद्यालयीन, विद्यापीठ व राज्यस्तरीय शिबिरात वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले आहे.त्यांच्या निवडीबद्दल संस्थाध्यक्ष हिरालाल भैया, सचिव अशोक भैया, प्राचार्य डॉ. कोकोडे, उप-प्राचार्य केला, प्रा. भाऊ दायदार, प्रा. ईश्वर मोहुर्ले, प्राचार्य पाटणकर, प्रा. बाळ गजभिये आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

‘आयएमए’चे संस्कार शिबीर
चंद्रपूर, २ मे / प्रतिनिधी

पतंजली योग समितीचे विमल कांस्टीया यांनी आयएमए सभागृहामध्ये मुलांच्या संस्कार शिबिरात स्वामी रामदेव महाराजांच्या आठ प्राणायाम आणि आसनाबाबत मार्गदर्शन केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने हे शिबीर झाले. याप्रसंगी विमल कांस्टिया पुढे म्हणाले, बालपणापासून जर योग व प्राणायामचे ज्ञान दिले, तर भारताचे भविष्य निश्चितच निरोगी असेल. आज हळूहळू मुलांना अस्थमा, मधुमेह, कॅन्सर अशा कितीतरी असाध्य रोगांनी ग्रासले आहे. याप्रसंगी वंदना भूषणवार, राजकुमार पाठक, अतुल ब्रह्मखत्री उपस्थित होते. शिबीर आयोजक डॉ. गोपाल मुंधडा यांनी स्वागत केले. शिबिराकरिता डॉ. रेखा दांडेकर, डॉ. दीपा निनावे, डॉ. गुलवाडे यांनी सहकार्य केले.