Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

सारेगमप फेम लिटिल चॅम्पसचा नगरला ९ रोजी कार्यक्रम
नगर, ३ मे/प्रतिनिधी

रायगड जिल्ह्य़ातील सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या निधी उभारणीसाठी झी मराठी प्रस्तुत सारेगमप फेम लिटिल चॅम्पस् लाईव्ह शो येथील रेसिडेन्शिअल विद्यालयाच्या मैदानावर दि. ९ रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेनऊदरम्यान होत असल्याची माहिती या कार्यक्रमाचे स्थानिक संयोजन समितीचे प्रमुख प्रा. मुकुंद घैसास यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाटय़

 

अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे सूत्रसंचालन असेल.
हा कार्यक्रम सामान्य जनतेच्या सहभागातून साकार व्हावा, याकरिता कार्यक्रमाची तिकीटे सहज परवडणारी अशी ५०, १००, ३०० व ५०० रुपयांची ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे देणगी मूल्य १ हजार रुपये असून, त्यासाठी १०० विशेष सन्मानित आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यात पहिल्या शंभरजणांना प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी विठ्ठल बुलबुले (९८२२६७२९०८), विवेक पवार (९४०३७३३३९८) आणि श्रीकांत वंगारी (९८९०४६७६७५) यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन घैसास यांनी केले.
कार्यक्रमासाठी स्वतंत्र व सुरक्षित सशुल्क पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिकिटांसाठी शहरात विविध २५ ठिकाणी केंद्रे उघडण्यात आली आहेत. या कार्यक्रमास लिटिल चॅम्पस्मधील पाच कलाकारांबरोबर सहावी कलाकार अवंती पटेल सहभागी होत आहे.