Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

खासदार बाळासाहेब विखे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कार्यक्रम
निघोज, ३ मे/वार्ताहर

खासदार बाळासाहेब विखे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. ५) अळकुटी येथे नित्यसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पारनेर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे व सरपंच नामदेव

 

घोलप यांनी दिली.
मंगळवारी रात्री ८ वाजता अळकुटी येथे खासदार बाळासाहेब विखे यांच्या हस्ते, तसेच आमदार नंदकुमार झावरे यांच्या अध्यक्षतेखाली नित्यसेवा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
बाभूळवाडे येथील अंजनाबाई यादवराव कोरडे यांना आदर्श माता पुरस्कार, डॉ. नारायणमहाराज जाधव (आळंदी) यांना धार्मिक कार्याबद्दल, कुसूम नामदेव शिंदे (अळकुटी) यांना आरोग्यविषयक कार्याबद्दल, पारनेर येथील आदर्श स्वयंसेवी संस्था म्हणून नागेश्वर मित्रमंडळ, तसेच ‘लोकसत्ता’चे वार्ताहर दत्ता उनवणे यांना उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल नित्यसेवा पुरस्कार देण्यात येणार आहे.
यानिमित्ताने जनकल्याण रक्तपेढी (नगर), नित्यसेवा प्रतिष्ठान (अळकुटी) यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रात्री चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांचा ‘चित्ररंग’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास माजी सरपंच बाबाजी भंडारी, भास्करराव शिरोळे, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब धोत्रे आदी उपस्थित राहणार आहेत.