Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

माणसाच्या जगण्याचा अन्वयार्थ शोधणारा बोधी नाटय़महोत्सव!
‘बोधी’ म्हणजे ज्ञान! आणि बोधी रंगभूमी म्हणजे ज्ञान रंगभूमी! मराठी रंगभूमीवरील ही एक आगळी-वेगळी संकल्पना! खरं तर मराठी रंगभूमीच्या- किंवा एकूणच भारतीय रंगभूमीच्या संकल्पनेतही अशा ज्ञान रंगभूमीच्या कल्पनेला स्थान नाही. स्थान असण्याचं कारणही नाही. कारण मराठी साहित्याची परंपराच मुळी सुरू होते वा मानली जाते ती ज्ञानेश्वरांपासून! ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’ म्हणजे ‘गीता’च की ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगितलेली! ‘सर्व काही घडतं वा घडवलं जातं ते माझ्याकडून! जन्म, जगवणं वा मरण मीच ठरवतो.’ परिणामी ‘माणूस’ स्वत: काहीच ठरवत नाही. ठरवणारा एकमेव मी- म्हणजे परमेश्वर! देवांनी घालून दिलेल्या मर्यादा माणूस पाळत आला.

विज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक :चर्चा नको, कृती हवी.. !
‘देशाचा विकास विज्ञान क्षेत्रातील विकासावर अवलंबून आहे’, हे विधान सर्वमान्य आहे, पण असे असूनही आजही विज्ञान क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे. या क्षेत्रात आजही भरीव गुंतवणूक जगभरात कोठेही होताना दिसत नाही. आता ही बाब काही प्रमाणात गांभीर्याने घेतली जात आहे. याचा फायदा देशालाच नव्हे तर जगाला होणार आहे. कारण विज्ञानाच्या संकल्पनेला कोणत्याही देशाची सीमा बंधन घालू शकत नाही. दोन देशांमधील स्पर्धा ही मुख्यत्वेकरून तंत्रज्ञानावर अवलंबून असते, विज्ञानावर नव्हे. म्हणूनच विज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी जागतिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

जिगीषा सांस्कृतिक केंद्रात एकांकिका व दीर्घाक
गोरेगावच्या नंदादीप शाळेतील जिगीषा सांस्कृतिक केंद्रामध्ये शनिवार, ९ मे रोजी सायं. ७.३० वा. ‘मिती चार, कल्याण’ या संस्थेची ‘तू, मी, इत्यादी’ ही २००८ सालातील सवरेत्कृष्ट सवाई एकांकिका आणि चं. प्र. देशपांडे लिखित ‘प्रेमच म्हणू याला हवं तर!’ हा दीर्घाक सादर होणार आहे. ‘तू, मी, इत्यादी’चे लेखक स्वप्नील चव्हाण व दिग्दर्शक सुदर्शन पाटील यांनाही सवाई लेखक व सवाई दिग्दर्शकाचा बहुमान प्राप्त झालेला आहे. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतही ही एकांकिका पुरस्कारविजेती ठरली होती. यातील कलावंत आहेत- ललित भदाणे, स्वप्नील चव्हाण आणि अमेय सावंत. ‘प्रेमच म्हणू याला हवं तर!’ हा दीर्घाक रवींद्र लाखे यांनी दिग्दर्शित केला असून, त्याला झी गौरव आणि म. टा. सन्मानची मानांकने मिळाली होती. अमोल कुलकर्णी आणि प्रियांका दामले यांनी यात भूमिका केल्या आहेत. जिगीषा केंद्राच्या प्रेक्षक सभासद योजनेची नोंदणी सुरू असून, अधिक माहितीसाठी संपर्क : भूषण ठाकूर- ९८२१८६७२३१ किंवा जिगीषा क्रिएशन्स प्रा. लि.- ९३२३७३४५९३ अथवा २८४०१६५३ (सोमवार ते शनिवार दुपारी ४ ते ६)
ई-मेल : response@jigishacreations.com