Leading International Marathi News Daily
बुधवार, ६ मे २००९
  विमानांची देखभाल - दुरुस्ती
  शेतीमधील अभ्यासक्रम
  लॉ.. लॉयर्स. एलपीओज्
  गोवेकर भारतीय नागरिकांसाठी ब्रिटनमधील शिक्षणाची संधी देणारी शिष्यवृत्ती योजना
डिसोझा ट्रस्ट गोवा स्कॉलरशिप २००९
  यशाची भूक
  यशस्वी करिअरचा फण्डा
  इंडियन बँक लिपिकपदाची तयारी
  प्रायोगिक पद्धती
  पॉझिटिव्ह अ‍ॅटिडय़ूड
एम. पी. एस. सी./ यू. पी. एस. सी.
यशाची गुरुकिल्ली.
  जनरल-नॉनलाइफ
इन्शुरन्समधील करिअरसंधी

 

सध्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियतेत ‘टॉप थ्री’मध्ये येणारी शाखा म्हणजे एअरक्राफ्ट मेन्टेनन्स अभियांत्रिकी होय. देशातील सर्व प्रमुख विमानतळांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे. वाढत्या विमानसंख्येसोबत त्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठीच्या तंत्रज्ञांची गरज फार मोठय़ा प्रमाणावर भासणार आहे. या क्षेत्रातील शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या महत्त्वाच्या संस्थांचा हा सारांशात परिचय..
पुढील दशक हे हवाई क्षेत्राचे राहील असे विधान देशाचे नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. भारतात आता अनेक खाजगी कंपन्यांची विमाने आकाशातून भरारी घेत आहेत. हवाई वाहतूक आता केवळ महानगरांपुरती मर्यादित न राहता छोटी शहरेसुद्धा हवाई मार्गाने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम भारत सरकार राबवणार आहे. देशातील सर्व प्रमुख विमानतळांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे. वाढत्या विमानसंख्येसोबत त्यांच्या
 

देखभाल, दुरुस्तीसाठीच्या तंत्रज्ञांची गरज फार मोठय़ा प्रमाणावर भासणार आहे. अभियांत्रिकीच्या काही शाखांना मार्केटमध्ये चांगली मागणी तर काही शाखांना सध्या फारसा वाव मिळत नसल्याचे दिसून आले आहे. कालानुरूप काही शाखा टॉपवर असतात. सध्या टॉप थ्रीमध्ये येणारी शाखा म्हणजे एअरक्राफ्ट मेन्टेनन्स अभियांत्रिकी. गेल्या काही वर्षांत नागरी व आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत वाढ झाल्याने विमान देखभाल आणि दुरुस्ती या क्षेत्रासाठी तज्ज्ञ व्यक्तींची पुढील काळात मोठी गरज भासणार आहे. या विषयातील प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात उत्तम संधी मिळू शकते. ही बाब लक्षात घेता या विषयातील अभ्यासक्रम करणे उपयुक्त ठरू शकेल.
या क्षेत्रातील शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या महत्त्वाच्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
० हिंदुस्थान एव्हिएशन अ‍ॅकॅडमी : या अकादमीतर्फे पुढील अभ्यासक्रम घेतला जातो-
एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरिंग
कालावधी- तीन वर्षे
अर्हता- १२ वी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
पत्ता : हिंदुस्थान एव्हिएशन अ‍ॅकॅडमी, पोस्ट बॉक्स क्रमांक ३७७६, चिन्नाप्पनाहल्ली, मराथल्ली पोस्ट, बंगलोर- ५६००३७, कर्नाटक.
दूरध्वनी : (०८०) २५२३८६५०/ २५२३२२१७
वेबसाइट : www.hindustanacademy.com
० इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एरोनॉटिक्स : ही संस्था पुढील अभ्यासक्रम घेते-
एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग
अर्हता : ५० टक्के गुणांसह १२ वी विज्ञान शाखा; भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी पदविका.
वयोमर्यादा : १७ ते २४ वर्षे.
निवड : लेखी स्पर्धा परीक्षेद्वारे.
अर्ज व माहितीपत्रकासाठी ४०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एरोनॉटिक्स, नवी दिल्ली’ या नावे पाठवावा.
पत्ता : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एअर मेन्टेनन्स, १८/५५, पंजाबी बाग (वेस्ट), नवी दिल्ली.
दूरध्वनी- (०११) २५२२३३७६
वेबसाइट : www.iianewdelhi.com
० ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी : या संस्थेत घेतला जाणारा अभ्यासक्रम-
एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरिंग
अर्हता : ५० टक्के गुणांसह १२ वी विज्ञानशाखा; भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा ५० टक्के गुणांसह कोणतीही अभियांत्रिकी पदविका.
वयोमर्यादा : १७ ते २४ वर्षे.
पत्ता : ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई- ४००१०१.
दूरध्वनी- (०२२) २८५४२४८१/ २८५४३५४०.
वेबसाइट : www.thakureducation.org
० सदर्न कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरिंग : या महाविद्यालयात पुढील अभ्यासक्रम शिकवला जातो-
एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरिंग
कालावधी : तीन वर्षे.
अर्हता : १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांत ५० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. गेल्या ५० वर्षांपासून ही संस्था या क्षेत्रातील प्रशिक्षण देत आहे. संस्थेचा अभ्यासक्रम ऑगस्ट महिन्यात सुरू होतो.
पत्ता : सदर्न कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, चालाकुडी- ६८०३०७ केरळ
दूरध्वनी : (०४८०) २७०८२९७/ २७११०४७
वेबसाइट : www.southerncollege.org
० विंग्ज कॉलेज ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी : हे विद्यालय हा अभ्यासक्रम घेते-
एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरिंग
अ) मेकॅनिकल शाखा या अंतर्गत जेट विमानांसारख्या विमानांची दुरुस्ती व देखभाल तर
ब) एव्हिओनिक्स शाखा यामध्ये रेडिओ नेव्हिगेशन सिस्टिम या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
अर्हता : ५० टक्के गुणांसह १२ वी विज्ञान शाखा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी पदविका.
अर्ज व माहितीपत्रकासाठी ३०० रुपयांचा डीडी ‘डब्ल्यूसीएटी पुणे’ या नावे पाठवावा.
पत्ता : १४०/६, वारजे चौकाजवळ, एन. डी. ए. रोड, वारजे माळवाडी, पुणे- ४११०५८.
दूरध्वनी : (०२०) २५२९२१५१
भ्रमणध्वनी : ०९३२६१९७०९६/ ०९३२६८४२०३५
वेबसाइट : www.iiaeit.org
० इंडियन इन्स्टिटय़ूट फॉर एरोनॉटिकल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड इन्फर्मेश टेक्नॉलॉजी : ही संस्था पुढील अभ्यासक्रम घेते-
एरोनॉटिकल इंजिनीअरिंग
अर्हता : १२ वी विज्ञान (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र)
प्रवेश अर्ज व माहितीपत्रासाठी ४०० रुपयांचा डीडी. ‘आयआयएईआयटी, पुणे’ या नावे पाठवावा.
पत्ता : इंडियन इन्स्टिटय़ूट फॉर एरोनॉटिकल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, १४०/६, वारजे चौकाजवळ, एन. डी. ए. रोड, वारजे, माळवाडी, पुणे- ४११०५२.
दूरध्वनी : (०२०) २५२९४१९७/ २५२९२२७७
भ्रमणध्वनी : ९८२२५९८२२६/ ०९८२२०१३६३३
वेबसाइट : www.iiaeit.org
० राजीव गांधी मेमोरियल कॉलेज ऑफ एरोनॉटिक्स : या महाविद्यालयात पुढील अभ्यासक्रमाची सोय आहे-
एअरक्राफ्ट मेन्टेनन्स कोर्स
अर्हता : १२ वी (पीसीएम) ५० टक्के गुण.
वयोमर्यादा : १७ ते २३ वर्षे.
अर्ज व माहितीपत्रकासाठी ५०० रुपयांचा डीडी ‘डायरेक्टर आरजीएमसीए जयपूर’ यांच्या नावे पाठवावा.
पत्ता : राजीव गांधी मेमोरियल कॉलेज ऑफ एरोनॉटिक्स,
संगानेर एअरपोर्टसमोर,
जयपूर- ३०२०११, राजस्थान.
दूरध्वनी- २७९२३५९.
० इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एरोनॉटिक्स, भोपाळ : या संस्थेने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एअरक्राफ्ट मेंटेनन्स हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा प्रारंभ दरवर्षी जुलै महिन्यात होतो. या अभ्यासक्रमाला डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशनने मान्यता प्रदान केली आहे. या अभ्यासक्रमातील २० टक्के जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात येतात. तसेच त्यांना फीमध्ये २० टक्के सूट दिली जाते. ही संस्था आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटना ‘इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायजेशन’ची मान्यताप्राप्त संस्था आहे. या संस्थेत पुढील अभ्यासक्रम घेतला जातो-
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एअरक्राफ्ट मेंटेनन्स
अर्हता : १२ वीला भौतिकशास्त्र गणित आणि रसायनशास्त्र या विषयांत ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. यंदा १२ वीच्या परीक्षेला बसणारे व १७ ते २४ वर्षे या वयोगटातील विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
निवड : प्रवेशासाठी नवी दिल्ली, कोलकाता, भोपाळ, जमशेदपूर आणि पाटणा या केंद्रावर कम्बाईन्ड एएमई टेस्ट घेतली जाते.
अर्ज व माहितीपत्रकासाठी ६०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एअर मेंटेनन्स, नवी दिल्ली या नावे पाठवावा.
पत्ता १ : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एअर मेंटेनन्स, १८/५५ पंजाबी बाग (वेस्ट), नवी दिल्ली. दूरध्वनी : (०११) २५२२३३७६.
पत्ता २ : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एरोनॉटिक्स, ५ टेम्पल व्ह्य़ू, निअर नेवरी मंदिर, लालघापि, भोपाळ. दूरध्वनी- (०७५५) २७४८०१८
वेबसाईट : www.iianewdelhi.com
० हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी : या संस्थेत पुढील अभ्यासक्रमाची सोय आहे
एअर क्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग
कालावधी : तीन वर्षे.
अर्हता : १२ वी (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यात ५० टक्के गुण) अर्ज व माहितीपत्रकासाठी १२५ रु.चा डी.डी. एचआयइटी, चेन्नई या नावे पाठवावा.
पत्ता : एचआयइटी, ४० जीएसटी, सेंट थॉमस माउंट, चेन्नई- ६०००१६. वेबसाईट : www.hindustancollege.com
० अ‍ॅकॅडमी ऑफ एरोस्पेस अ‍ॅण्ड एव्हिएशन : या संस्थेत पुढील अभ्यासक्रमाची सोय आहे.
एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग
कालावधी : तीन वर्षे.
अर्हता : १२ वी (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यात ५० टक्के गुण)
पत्ता : कॉलेज ऑफ एरोनॉटिक्स, १०/११ कोगीवार लेआउट, यशोदानगर, हिंगना रोड, नागपूर- ४४००१६.
दूरध्वनी : (०७१२) २२३७०४०.
अर्ज व माहितीपत्रकासाठी ५७५ रु. चा डी.डी. पाठवावा.
वेबसाईट : www.aaaindore.com
० जे. आर. एन. इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी: या संस्थेत पुढील अभ्यासक्रमाची सोय आहे.
एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग
अर्हता : १२ वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात ५० टक्के गुण)
वयोमर्यादा : १७ ते २४ वर्षे.
निवड : कम्बाईंड एएमई एन्ट्रस परीक्षेद्वारे.
ही परीक्षा दिल्ली, भोपाळ, पाटणा या केंद्रावर साधारणत: जून महिन्यात घेतली जाते. या संस्थेत २० टक्के जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अर्ज व माहितीपत्रकासाठी ४०० रुपयांचा डीडी ‘जे.आर.एन. इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली या नावे पाठवावा.
पत्ता : १०२, सुनेजा टॉवर, १-७ जनक पॅलेस, जनकपुरी, न्यू दिल्ली- ११००५९.
दूरध्वनी : (०११) २५५४१८८२.
वेबसाइट : www.jrniat.org
० हिंदुस्थान एरोस्पेस अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग : ही संस्था पुढील अभ्यासक्रम घेते-
एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग
अर्हता : १२ वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात ५० टक्के गुण किंवा ५० टक्के गुणांसह इंजिनीअरिंग डिप्लोमा)
वयोमर्यादा : १७ ते २४ वर्षे.
कालावधी : तीन वर्षे.
पत्ता : २५८/२, बालाजी पार्क, आनंद पार्कच्या मागे, औंध, पुणे- ४११०२८.
दूरध्वनी : (०२०) २७२९८६७२.
० इंडियन एरोस्पेस अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग : या संस्थेत पुढील अभ्यासक्रम घेतला जातो-
एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग
अर्हता : १२ वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात ५० टक्के गुण किंवा ५० टक्के गुणांसह इंजिनीअरिंग डिप्लोमा)
वयोमर्यादा : १७ ते २४ वर्षे.
कालावधी : तीन वर्षे.
पत्ता : प्लॉट नं. ९ आणि १०, जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, एमजीएम कॉलेजजवळ, कामोठे, पनवेल, नवी मुंबई- ४१०२०९२.
दूरध्वनी : (०२२) २७४२६११०/ २७४२६४१७.
वेबसा़ईट : www.shashibgroup.org
पुष्कर मुंडले