Leading International Marathi News Daily
रविवार, ३ मे २००९

नवे विजय मिळवाल
राशीस्थानी सूर्य, दशमांत राहू, पंचमात शनी, लाभांत गुरू याच ग्रहपर्वामध्ये नव्या विजयाची नोंद आपल्या कार्यप्रांतात करता येईल. त्यातून नवे संपर्क वाढतात. परिचय व्यापक होतात. आर्थिक प्रगतीचे मार्ग निर्वेध करून घेता येतात. मंगळवारच्या रवी-शनी नवपंचम योगाच्या आसपास याचा विशेष प्रत्यय यावा. मोठे अधिकार हाती येतील. आकर्षक खरेदी संभवते, प्रापंचिक प्रश्न आणि खर्च व्ययस्थानी शुक्र, मंगळ असेपर्यंत पिच्छा सोडणार नाहीत.
दिनांक- ३, ४, ८, ९ शुभ काळ.
महिलांना- सामाजिक क्षेत्रात चमकाल.

यशस्वी काळ
भाग्यात राहू, दशमांत गुरू, लाभात शुक्र, मंगळ राशीस्थानी बुध,‘कार्य गुणिले प्रयत्न बरोबर नेत्रदीपक यश’ असा ग्रहपर्वकाळ शनिवारच्या पौर्णिमेपर्यंत लाभलेला असल्याने व्यवहाराची गाडी वेगानेच पुढे सरकत राहील. सर्वच क्षेत्रात आघाडी मिळेल. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. व्यवसायातून पैशांची कमाई चांगली होईल. चतुर्थात शनी, व्ययस्थानी रवी असेपर्यंत थोडय़ा कटकटी, काही दडपणे आपल्याबरोबर राहतील. पण चिंता करण्याचे कारण नाही. सर्व समस्यांवर मात करून यश मिळवाल.
दिनांक- ५, ६, ७ शुभ काळ
महिलांना- कर्तृत्वाचा प्रभाव प्रस्थापित कराल. आनंदी वातावरण असेल. कौटुंबिक पातळीवर सुख अनुभवाल.

शक्तिकेंद्र निर्माण होतील
पराक्रमी शनी, भाग्यात गुरू, दशमात शुक्र, मंगळ लाभात, सूर्य प्रयत्नातून प्रगती, प्रगतीमधून प्रभाव आणि प्रभावातून नवी निर्माण होणारी शक्तिकेंद्रे अशा ग्रह प्रत्ययाचा काळ शनिवारच्या चंद्र, हर्षल नवपंचम योगापर्यंत आहे. राजकारण, कला-साहित्य, विज्ञानात मिथुन व्यक्ती कार्यक्षितिजावर तळपत राहील. मंगळवारच्या रवी, शनी नवपंचम योगाच्या आसपास याच क्षेत्रात चमत्कारही घडू शकतील. कागदपत्र आणि आरोग्य यांवर लक्ष ठेवा.
दिनांक- ३, ४, ७, ८ शुभ काळ
महिलांना- आप्तांच्या भेटी, प्रवास; शिक्षणात यश.

प्रतिष्ठा सांभाळता येईल
साडेसाती, अष्टमात गुरू याचाच अर्थ समस्या आणि विवंचना एकाच वेळी हातात हात घालून कार्यपथावर आपल्याबरोबर प्रवास करीत राहतील; परंतु भाग्यात शुक्र, मंगळ, दशमात सूर्य, लाभात बुध सप्तमांत राहू यांच्यामुळे शनिवारच्या पौर्णिमेपर्यंत प्रतिष्ठा मजबूत ठेवता येईल. समस्या असल्या तरी चिंता करण्याचे कारण नाही. श्री मारुतीची उपासना, आराधना मन:शांतीची ठरेल. ऐन वेळी आधार मिळवून देईल. नोकरीतले प्रश्न सुटतील. प्रापंचिक जबाबदाऱ्या कमी होतील. प्रवास, भेटी सत्कारणी लागतील. त्यातून तुम्हाला विशेष आनंद मिळेल.
दिनांक-३ ते ६ शुभ काळ
महिलांना- संयम ठेवा, प्रयत्न करा, यश निश्चित मिळेल.

गणिते अचूक सुटतील
साडेसाती, षष्ठात राहू, अष्टमात शुक्र, मंगळ या ग्रहकाळात प्रयत्न आणि यश यांचे प्रमाण व्यस्त होते. परंतु गुरूची कृपा, भाग्यात रवी, दशमात बुध यामधून प्रमाण व्यस्त असूनही व्यावहारिक गणित अचूक सोडवता येणार आहे. परिणामी, शनिवारच्या चंद्र-हर्षल नवपंचम योगापर्यंत आपला प्रवास सुरू ठेवता येईल. त्यात अनेकांचे सहकार्य मिळवून आणीबाणीच्या प्रसंगातून बाहेर पडू शकाल. श्री मारुतीची उपासना, अडचणी दूर करण्यास उपयुक्त ठरेल.
दिनांक- ५ ते ९ प्रगतीचा काळ
महिलांना- निर्धार आणि निष्ठेमुळे यश मिळेल.

यश मिळेल
पंचमात राहू, सप्तमात शुभ मंगळ, भाग्यात बुध यांची अनुकूलता आणि साडेसाती, षष्ठात गुरू यांची नाराजी या ग्रहकाळात श्रद्धा सबुरीच अखेर निर्णयात्मक कृतीमधून यश देईल. परिणामी राजकारण, कला, साहित्य, शिक्षण, व्यापार या प्रांतातील प्रतिमा सांभाळते. शनिवारच्या चंद्र-हर्षल नवपंचम योगापर्यंत विचलित होऊ नका. एकाग्रचित्ताने प्रयत्न करीत राहा व आपला प्रवास सुरू ठेवा. तुमचे प्रयत्न व आत्मविश्वास या जोरावरच तुम्ही यशस्वी व्हाल. साठा उत्तराची कहाणी अखेर सफलतेचा आनंद देणारी ठरेल.
दिनांक- ६ ते ९ याची प्रचीती येत राहील.
महिलांना- समस्यांतून मार्ग काढा, यश तुमचेच आहे. मनासारख्या घटना घडतील. यश मिळाल्याने आनंदी राहाल.

व्यत्यय दूर होतील
गुरूची कृपा, शनीचे सहकार्य, सप्तमात सूर्य, प्रयत्नाने प्रगतीचा वेग हवा तसा ठेवता येईल. त्यात चतुर्थात राहू, अष्टमात बुध यांच्यामुळे काही व्यत्यय येतील. परंतु त्यामुळे विचलित होऊन कार्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता नाही. मंगळवारचा रवी-शनी नवपंचम योग अधिकार अर्थप्राप्ती, नवे संपर्क, अचूक व्यापारी निष्कर्षांमधून व्यत्ययांची विवंचना दूर करता येईल. शनिवारच्या पौर्णिमेपर्यंत मार्गी लागलेल्या उपक्रमातून व्यवहाराची घडी बसवता येईल.
दिनांक : ३, ४, ८, ९ शुभकाळ.
महिलांना : समाजकार्याची प्रकरणे मार्गी लागतील.

उपक्रमातून सफलता
पराक्रमी राहू, पंचमात शुक्र, मंगळ, दशमांत शनी, मेष, रवी, वृषभ, बुध, अनुकूल ग्रहांची एवढी संख्या काही दशकांनंतरच दृष्टिपथात येत असल्याने शनिवारच्या पौर्णिमेपर्यंत उपक्रम उरकण्याचा धडाका लावला तर शत्रूंना पळता भुई थोडी होईल. परिणामी अनेक कार्यात वृश्चिक व्यक्तींचा यशध्वज फडकत राहील. राजकीय शक्ती वाढेल. व्यापारी प्राप्ती मजबूत होईल. चतुर्थातील गुरूमधील समस्या चार भिंतींच्या बाहेर त्रास देऊ शकणार नाहीत. त्यामुळे नाहक चिंता करीत बसू नका. आपल्या कार्यात एकाग्रचित्ताने काम करीत राहा.
दिनांक : ३ ते ६ अनुकूल काळ.
महिलांना : प्रयत्न सत्कारणी लागतील. कौटुंबिक पातळीवर आनंदाचा प्रत्यय येईल.

मजबूत असामी बनाल
पराक्रमी गुरू, भाग्यात शनी, मीन राशीत शुक्र, मंगळ, मेष, सूर्य, कराल ती पूर्व असा ग्रहकाळ आहे. दूरच्या दृष्टीने शिकस्तीचे प्रयत्न आणि व्यावहारिक कुशलता यांच्या समन्वयातून ग्रहकाळाचा उपयोग केला तर धनू व्यक्ती काही प्रांतांत मजबूत असामी होऊ शकेल. रवी, शनी नवपंचम योग अर्थप्राप्ती, सामाजिक प्रतिष्ठा, कला साहित्याचे करार, कौटुंबिक जबाबदाऱ्या यामध्ये झटपट यश देण्यास सहकार्य करणार आहे. त्यामुळे सतत घडय़ाळाच्या काटय़ावर लक्ष ठेवा.
दिनांक : ४ ते ८ शुभकाळ.
महिलांना : आप्तांच्या भेटी होतील

प्रवासात आनंद मिळेल
राशिस्थानी राहू, पराक्रमी शुक्र, मंगळ, पंचमात बुध आणि गुरूची कृपा अशा समर्थ ग्रहांचे सहकार्य घेऊन सुरू असलेला प्रवास शनिवारच्या चंद्र, हर्षल नवपंचम योगापर्यंत तीर्थयात्रेसारख्या सफलतेच्या आनंदात पूर्ण करता येईल. त्यात नवीन मंडळी भेटतील. नवे मार्ग दृष्टिपथात येतील. त्यातून सुरू असलेल्या शोधांना आकर्षक आकार देता येईल. नवीन उद्योगकेंद्रे उभी करण्याचे ठरवाल. प्रपंचातील समस्या सुटतील. पैसा मिळवता येईल. व्यासपीठ आणि रंगभूमीवर स्वत:ची नवी प्रतिमा तयार करू शकाल. जी आगामी काळात प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल.
दिनांक : ५ ते ९ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्न करा, संधीतून सफलता मिळवता येईल. प्रतिष्ठा वाढेल.

प्रश्न भराभर सुटतील
पराक्रमी सूर्य, मीन, शुक्र, मंगळ राशीस्थानी गुरू, सप्तमांत शनी ग्रह खूष असले तर व्यवहारातले प्रश्न कसे भराभर सुटत राहतात, याचा प्रत्यय कुंभ व्यक्तींना येत असेल. मंगळवारच्या रवी-शनी नवपंचम योगाच्या आसपास त्याची व्यापकता आकर्षक होईल. व्ययस्थानाचा राहू धर्मकार्यातून आनंद देतो, परंतु व्यवहारात चुका झाल्यावर अडचणीत आणू शकतो. तात्पर्य भराभर सुटत राहणाऱ्या समस्यांचा वेग कमी होऊ नये, यासाठी सतर्क राहा.
दिनांक : ३, ४, ८, ९ शुभकाळ.
महिलांना : समाजात सन्मान मिळवाल.

समन्वयातून यश
राशीस्थानी शुक्र, मंगळ, पराक्रमी बुध, मेष रवी लाभात राहू कोणतेही कार्य प्रयत्न आणि कुशलता यांच्या समन्वयातून यशस्वी करणारी अनुकूलता शनिवारच्या पौर्णिमेपर्यंत आपणास याच ग्रहांमधून मिळणार आहे. गुरू-शनीचे अनिष्ट परिणाम सत्य आणि संयम यांच्यातून नियंत्रित करता येतील. प्रवास होतील. त्यातूनच नवीन परिचितांचा परिवार तयार होईल. जो तुम्हाला आनंद देणारा ठरेल. पैसा मिळेल. रंगभूमीवर चमकाल. व्यासपीठ गाजवाल, नोकरीत चांगले बदल होतील. व्यापार भरभराटीला आणता येईल. चांगले यश मिळेल.
दिनांक : ५, ६, ७ शुभकाळ.
महिलांना : नेत्रदीपक यशातून कर्तृत्व उजळून निघेल.