Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

सामाजिक वनीकरणातर्फे पर्यावरणविषयक उपक्रम
जळगाव / वार्ताहर

सध्या सुटीचे दिवस असून जिल्ह्य़ातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा हा वेळ सत्कारणी लागावा व त्यांच्यामध्ये पर्यावरण विषयक गोडी कायम रहावी, या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना

 

अनेक बाबींविषयी नव्याने माहिती मिळणार आहे.
उन्हाळ्यामध्ये बाजारात आंबा, फणस, जांभूळ इत्यादी विविध प्रकारची फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ही फळे खाताना त्यापैकी चांगल्या फळांच्या बिया गोळा करण्यात याव्यात तसेच शाळा किंवा घराजवळ मोह, चंदन, नीम, करंज, एरंड या तेल बियांची झाडे असतील तर त्याच्याही बिया गोळा करण्यात याव्यात. याशिवाय, धार्मिकदृष्टय़ा महत्वपूर्ण असलेल्या वड, उंबर, आपटा, शमी, बेल, आवळा, तुळस आदी झाडांचे तसेच नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी उपयुक्त असलेल्या पळस, पांगरा आदी झाडांच्या बिया देखील गोळा करण्यात याव्यात, असे आवाहन या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे.
वनीकरण विभागाने विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या फळ व तेलबियांच्या शाळेच्या शिक्षकांनी हिशेब ठेवावा तसेच माळरानावर त्यांची पेरणी करावी यासाठी क्षेत्र निवड व तांत्रिक माहिती विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे धार्मिकदृष्टय़ा महत्वपूर्ण असेलल्या वड, आवळा, उंबर, शमी, बेल या बियांपासून शाळांनी रोपे तयार करून त्याची लागवड करावी तसेच जे नागरिक रोपे जगविण्याची हमी घेतील त्यांना ती वाटावीत असे कळविण्यात आले आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांसह विद्यार्थ्यांनाही सन्मानीत करण्यात येणार आहे.
उन्हाळी फळांतून मिळणाऱ्या, व्यावहारिक उपयुक्ततेच्या वृक्षांच्या आणि धार्मिकदृष्टय़ा महत्त्वाच्या वृक्षांच्या बिया गोळा करण्याचे आवाहन