Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

शहराच्या निम्म्याहून अधिक भागामध्ये आज सात तास वीज बंद
पुणे, ६ मे/ प्रतिनिधी

शहराच्या विविध भागांमध्ये दुरुस्तीची मोठी कामे करण्यात येणार असल्याने उद्या (गुरुवारी) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील निम्म्याहून अधिक भागामध्ये सकाळी १० ते संध्याकाळी पाच या वेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे ‘महावितरण’कडून

 

कळविण्यात आले आहे.
पर्वती विभागामध्ये फरासखाना, लक्ष्मीरस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता, नवी पेठ, गांजवे चौक, अंबिल ओढा, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, मंडई, बुधवार पेठ, विजयनगर कॉलनी, भरतनाटय़ मंदिर, माणिकबाग, सिंहगड रस्ता, शारदामठ व धनकवडीचा भाग बंद राहणार आहे.
बंडगार्डन विभागामध्ये वाडिया कॉलेज, रुबी हॉस्पिटल, कसबा, गाडीतळ, सोमवार, मंगळवार पेठ, जिल्हा परिषद, लक्ष्मी रस्ता, सोलापूर रस्ता, शेवाळवाडी, फुरसुंगी परिसरात वीजपुरवठा खंडित राहील. पद्मावती विभागातील शंकरशेठ रस्ता, मीरा सोसायटी, हरकानगर, लोहियानगर, मुकुंदनगरचा काही भाग, घोरपडी पेठ, भवानी पेठचा काही भाग, हिराबाग, सुभाषनगर, गुरूवार पेठ, महर्षीनगर, सुखसागरनगर, बिबवेवाडी, बालाजीनगर, कात्रज, जांभुळवाडी, गुजरवाडी, सॅलिसबरी पार्क, तळजाई पठार, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ, दत्तनगर, चैतन्यनगरमधील वीज या काळात बंद ठेवण्यात येणार आहे.नगर रोड विभागात लोहगाव, चंदननगर, खराडी, विमाननगरचा भाग, कल्याणीनगर, कोरेगव पार्क व कोथरूड या विभागांत येणारा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कर्वे रस्ता, पुलाची वाडी या सर्व भागामध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे.