Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

आयुर्वेदाच्या ‘ग्लोबलायझेशन’ची गरज - डॉ. रघुनाथ माशेलकर
पुणे, ६ मे / प्रतिनिधी

जागतिक स्तरावर आयुर्वेदला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी आयुर्वेदाचे ‘ग्लोबलायझेशन’ होण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी येथे व्यक्त केले. वैद्य दिलीप गाडगीळ यांनी विकसित केलेल्या आयुर्वेदाच्या औषधापचाराच्या सल्ला मार्गदर्शन देणाऱ्या www.health-world-ayur.com या संकेतस्थळाच्या उद्घाटन

 

प्रसंगी ते बोलत होते.
आयुर्वेदाचे उपचार तसेच प्राथमिक आणि दुसऱ्या टप्प्यावर होणाऱ्या कर्करोग, हृदयरोग, मधुमेह सारख्या विविध आजारांविषयी माहिती तसेच योग्य सल्ले देऊन रुग्ण बरा करता यावा, हा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी वैद्य गाडगीळ, डॉ. धनजंय केळकर, डॉ. अरिवद कुलकणी, डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. मनोज नाईक, हरिभाऊ लिमये आणि वैद्य माधवी गाडगीळ आदींची यावेळी उपस्थिती होती. सध्याच्या युगात आधुनिक उपचार पद्धती, आयुर्वेद आणि विज्ञान या तीन पद्धतींचा सुवर्ण मध्य साधून रुग्णावर उपचार होण्याची आवश्यकता असल्याचे मत ही डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी यावेळी व्यक्त केले.
या संकेतस्थळासंदर्भात वैद्य गाडगीळ यांनी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. अरविंद कुलकर्णी म्हणाले, भारतातील ८० टक्के रुग्ण प्राथमिक अवस्थेत बरे करण्याचे सामथ्र्य हे आयुर्वेदात आहे. त्यामुळे आयुर्वेदाला महत्त्व प्राप्त करून देण्याची गरज आहे.
वैद्य प्रशांत सुरू यांनी सूत्रसंचालन केले.