Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

पोलीस शिपायास मारहाण करणाऱ्यास पाच हजार दंड
पुणे, ६ मे / प्रतिनिधी

आरोपीस खाण्यासाठी देण्यास मनाई करणाऱ्या पोलीस हवालदारास मारहाण करणाऱ्या हितेश हिरालाल ठक्कर (वय २८, रा. धनकवडी) याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. ढवळे यांनी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिने

 

सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
अहमद खान पठाण या पोलीस हवालदारांनी ही तक्रार दिली होती. २५ सप्टेंबर २००८ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात ही घटना घडली. पठाण हे शिवाजीनगर मुख्यालयात नोकरीस आहेत. घटनेच्या दिवशी येरवडा कारागृहातील आरोपींना न्यायालयात आणण्याचे काम त्यांच्याकडे होते. तरबेज महेमूद सुतार या आरोपीला कारागृहातून न्यायालयात आणले. तेथील सुनावणी संपल्यानंतर सुतार याला व्हॅनकडे घेऊन जात असताना आरोपी ठक्कर हा त्याचा असलेला नातेवाईक याने सुतार याला खाण्यासाठी काही वस्तू आणल्या असून, त्यासाठी परवानगीची मागणी पठाण यांच्याकडे केली. त्या वेळी त्याला नकार दिल्याने पठाण यांना ठक्कर याने मारहाणीस सुरुवात केली. त्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक सरकारी वकील अॅड. प्रकाश गायकवाड यांनी साक्षीदार तपासले.