Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

पिंपरीतील रिक्षा संघटनाही ‘बंद’ पुकारण्याच्या तयारीत
मुंबईतील बोलणी फिसकटली
पिंपरी,६ मे / प्रतिनिधी

पुणे येथील रिक्षा आंदोलनावर सकाळी मुंबई येथील सुरु असलेली बोलणी फिसकटल्याने रिक्षा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातही बेमुदत बंद पुकारण्याचा विचार असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी आज लोकसत्ताला

 

सांगितले.
‘बंद’च्या निर्णयाबाबत उद्या सकाळी अकरा वाजता पिंपरी येथे महात्मा फुले पुतळा आवारात एक तातडीची बैठक निमंत्रित करण्यात आली आहे, असे कांबळे यांनी सांगितले. आजवर पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षांचा मीटर सक्तीचा विषय स्थगित झाल्याने आम्ही बंद मधून माघार घेतली होती. पुण्यातील आंदोलनात तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात प्रशासनाची मुजोर वृत्ती कायम राहिली आहे. त्यामुळे आंदोलन राज्यभर पसरण्याची शक्यता आहे. त्यात पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा संघटनाही उतरतील असे कांबळे यांनी सांगितले. महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष शरद राव यांच्याबरोबर बोलणी आज बोलणी झाली. पुणे शहरातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. निर्णयासाठी राज्यातील संघटनांची बैठक निमंत्रित केली जाणार आहे, अशी माहिती कांबळे यांनी दिली.