Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

अबिकॉर बिंझेलच्या कामगारांना विक्रमी वेतनवाढ
पिंपरी, ६ मे / प्रतिनिधी

आर्थिक मंदीच्या तीव्र झळा उद्योग क्षेत्राला लागत असतानाच पिरंगुट या औद्योगिक परिसरातील ‘अबिकॉर बिंझेल प्रॉड. प्रा. लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीतील कामगारांना चार हजार नऊशे रुपये इतकी विक्रमी पगारवाढ झाल्याने कामगारांनी फटाक्यांच्या आतषबाजी

 

व गुलालाची उधळण करुन जल्लोष केला.
येथील ‘अबिकॉर बिंझल व्यवस्थापन व भारतीय मजदूर संघ यांच्यामध्ये आज वेतनवाढीचा करार झाला.कामगारांच्या वेतनात प्रत्यक्ष ४९०० रुपयांची वाढ झाली करण्यात आली.या वेतनवाढीच्या ६३ टक्के रक्कम मूळ पगारात तर ३७ टक्के रक्कम विविध भत्त्यात देण्याचे करारात नमूद केले आहे, अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख सचिन मेंगाळे यांनी दिली.
कामगार उपायुक्त अनिल लाकसवार व सहायक कामगार आयुक्त रमेश सावंत यांच्या उपस्थितीत या कराराच्या मसुद्यावर व्यवस्थापनाच्या वतीने मुख्य कार्यकारी यू. व्ही. गोडबोले, वरिष्ठ व्यवस्थापक डी. बी. कुलकर्णी, तर भारतीय मजदूर संघाच्या वतीने अध्यक्ष अर्जुन चव्हाण, कामगार प्रतिनिधी शिवाजी साठे, नवनाथ बर्डे, संदीप जाधव यांनी स्वाक्षऱ्या केल्या.या प्रसंगी कंपनीचे सल्लागार डी. जी. शहाणे, व कामगार संघाच्या वतीने चिटणीस मेंगाळे, अॅड. उमेश विश्वाद हे उपस्थित होते.
या करारांतर्गत कामगारांना १९ टक्के बोनस मिळणार आहे. वार्षिक प्रवास भत्ता म्हणून २८८० रुपये वाढ, तसेच ३९० रुपये ते ६५० रुपये दरमहा प्रवास भत्ता, दुसऱ्या व तिसऱ्या पाळीत काम करणाऱ्या कामगारांना १५ ते २० रुपये ‘शिफ्ट’ भत्ता देण्याचे कराररात नमूद करण्यात आले.कामगार व त्यांच्या कुटुंबीयाकरिता एक लाख रुपये वैद्यकीय सुविध्या (मेडिक्लेम), अपघाती विम्याचे संरक्षण,उपादन प्रोत्साहन भत्ता २० हजार बिनव्याजी कर्ज, आदी सुविधा देण्यात आल्या आहेत, कराराचा कालावधी एक जून २००८ ते ३१ मे २०१२ असा आहे.