Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

महापालिकेने कायमस्वरूपी हॉकर्स झोन स्थापन करावे
पिंपरी, ६ मे / प्रतिनिधी

केंद्र सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबवीत असलेल्या जवाहरलाल नेहरु शहरी पुनर्निमाण (जेएनएनयूआर) योजने अंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात कष्टकरी वर्गासाठी कायमस्वरुपी हॉकर्स झोन योजना राबविण्यात यावी, अशी मागणी

 

इंटरनॅशनल हॉकर्स फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
इंटरनॅशनल हॉकर्स फेडरेशनच्या वतीने नुकतीच पिंपरी- चिंचवड महापालिकेला भेट दिली यावेळी फेडरेशनच्या संशोधन विभागाचे प्रमुख जसरीन सिंग (प्रोग्राम मॅनेजर), शालिनी सिन्हा (विकास व संशोधन सल्लागार) तर महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे, जनसंपर्क अधिकारी प्रवीण गायकवाड, भूमी जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी अर्जुन मद्रेवार आदी उपस्थित होते.
या वेळी महापालिकेच्या वतीने मान्यता दिलेल्या ‘हॉकर्स पॉलिसी २००७’ या बाबत माहिती सिंग यांना देण्यात आली.तसेच हॉकर्स धोरणाची प्रत त्यांनी देण्यात आली. ही सर्व माहिती ऐकून शिष्टमंडळ प्रभावीत झाले. अशा प्रकारे हॉकर्स बाबतीत धोरण राबविणारी पिंपरी-चिंचवड महापालिका देशातील आदर्श व एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था आहे,असे गौरवास्पद उद्गार सिंग यांनी काढले.या धोरणाच्या आधारे देशातील अनेक महापालिकांना हॉकर्स धोरण राबविण्यास भाग पाडू ,असे सिंग म्हणाल्या. टपरी,पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यावेळी उपस्थित होते.