Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

द्रुतगती मार्गावर तरुणास लुबाडले
पिंपरी, ६ मे / प्रतिनिधी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाकड येथे असलेल्या साई पेट्रोल पंपाजवळ एका तरुणावर चाकूने वार करून लुबाडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
िहजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय प्रदीप गौरवाडकर (वय २३, रा. भारतमाता हौसिंग सोसायटी, आकुर्डी) असे लुबाडण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

त्याला व त्याच्या मित्रावर वार करून लुबाडल्याप्रकरणी दोन अनोळखी मोटारसायकलस्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अमेय व त्याचा मित्र काल सायंकाळी गाडीतील पेट्रोल संपल्याने गाडी ढकलत पेट्रोल पंपाकडे जात होते. दरम्यान, मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोघाजणांनी त्यांना अडवून तुम्ही गावातून भांडणे करून आला आहात का? तुमच्या जवळ कोणते हत्यार आहे का? याची आम्हाला खात्री करायची आहे, असे सांगून त्यांच्यावर चाकून वार करून अमेयच्या मित्राजवळ असलेले दोन मोबाईल संच, सोन्याची अंगठी असा १२ हजार पाचशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. कॉलेज तरुणांना याच महामार्गावर लुटण्याची ही गेल्या दोन आठवडय़ातील तिसरी घटना आहे. यासंबंधी अधिक तपास फौजदार अशोक वंजारी करीत आहेत.